मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्ष घरात बसलेल्या नागरिकांनी दिवाळीचा सुट्टी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखलेला आहे. मात्र, त्यांना भाडेवाढीचा फटका बसणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून तोटा सहन करणाऱ्या . राज्यातील खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीने नाईलाजास्त तिकीट दरात सरासरी ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या बाबतचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीमुळे ऐन दिवाळीत सामान्यांना आर्थिक भूर्दंड! नाईलाजास्त खासगी बसेसचे भाडेवाढ -एकीकडे कोरोना नियंत्रणात येत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. त्यामुळे आता पर्यटन स्थळे, मॉल, हॉटेल आणि धार्मिक स्थळे खुले झाले आहे. यामुळे दीड वर्ष घरात बसलेल्या नागरिकांनी दिवाळीचा सुट्टी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे. मात्र, त्यांना राज्यातील एसटी आणि खासगी बस ट्रॅव्हल्सचा भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे राज्यातील एसटीसह खासगी प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाला आणि राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे. याशिवाय एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने 17.17 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. तर राज्यातील खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीने नाईलाजास्त तिकीट दरात सरासरी 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना बाहेर करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
फक्त 40 टक्के बसेस रस्त्यावर -
मुंबई बस मालक संघटनेचे सरचिटणीस हर्ष कोटक यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, कोरोनापूर्वी काळात मुंबई येणाऱ्या आणि जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीचा बसेसची सँख्या 1 हजार 800 इतकी होती. मात्र, कोरोनामुळे गेली दीड वर्ष या सर्व गाड्या उभ्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीचा बस गाडया नुकत्याच रस्त्यावर धावायला लागल्या आहे. सध्या प्रवासी नसल्याने बस गाड्यांची सँख्या कमी झालेली असून आज सरासरी 650 ते 700 बसेस मुंबई ये-जा करत आहे. मात्र,दिवाळीत गर्दी लक्षात घेता या गाड्यांची सँख्या 700 वरून 1 हजार 200 पर्यत जाणार आहे. तरी सुद्धा पूर्ण क्षमतेने या बसेस धावला उशीर लागणार आहे.
भाडेवाढीशिवाय पर्याय नाही-
सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सहाशे ते सातशे गाड्या परत सुरू झाला असल्या तरी, गेले दीड वर्ष उभ्या असलेल्या बस गाड्यांना परत सुरू करण्यासाठी मोठा खर्च आहे. याशिवाय इंधन दरवाढीमुळे आमचा मोठा तोटा होत आहे. कोरोनापूर्वी 62 रुपये प्रति लीटर डिझेल होते ते आज 104 रुपये प्रति लिटर डिझेल झाले आहे. आता हा खर्च काढायचा कुठं...? असा मोठा प्रश्न आमचा समोर पडलेला आहे. आम्ही गेल्या वर्षपासून सरकारला मदतीची मागणी केली होती. मात्र आमची एक अशी मागणी आतापर्यंत मान्य झालेली नाही. परिणामी आम्हाला नाईलाजास्त भाडेवाढ करावी लागणार आहे. सरकारने डिझेल किंमती कमी कराव्यात जेणेकरून आम्हाला भाडेवाढ करण्याची वेळ येणार नाही. आमच्या प्रवाशांना सुद्धा त्रास होणार नाही असेही हर्ष कोटक यांनी ईटीव्ही भारतला सांगीतले.
असे असणार नवीन दर-
राज्यातील खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीने तिकीट दरात सरासरी 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शयनयान आणि बैठी आसने असलेल्या सर्व बससाठी हे दर 30 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहेत.सध्या मुंबई ते बंगळूर धावणाऱ्या बसेसचा शयनयानचा तिकिटाचे दर 1 हजार 800 रुपये आणि बैठी आसनेचा तिकिटाचे दर 1हजार 300 रूपये आहे. आता नव्या भाडेवाढीनुसार शयनयानचा तिकिटाचे दर 2 हजार 100 रुपये तर बैठी आसन तिकिटाचा दर 1 हजार 500 रुपये होणार आहे. याच प्रमाणे आता हैदराबाद ते मुंबई शयनयानचा तिकिटाचे दर 2 हजार रुपये ते बैठी आसन तिकिटाचे दर 1 हजार 200 रुपये , मुंबई-मंगळूर शयनयानचा तिकिटाचे दर 3 हजार रुपये आणि बैठी आसनाचा दर 1 हजार 800 रुपये, गोवा-मुंबई शयनयानचा तिकिटाचे दर 1 हजार 500 रुपये ते बैठी आसन तिकिटाचे दर 1 हजार 800रुपये, मुंबई-कोल्हापूर शयनयानचा तिकिटाचे दर 1 हजार 100 रुपये ते बैठी आसन तिकिटाचे दर 1 हजार 200 रुपये असे नव्या भाडेवाढीनुसार तिकिटाचे दर असणार आहे.