ETV Bharat / city

छट पूजा आणि दिवाळीसाठी रेल्वे गाड्या हाऊसफुल; बहुतांश गाड्या प्रतीक्षा यादीत! - गाड्यांचे आरक्षण फुल्ल

दरवर्षी छठपूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबई आणि उपनगरात काम करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशात जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता असताना सुद्धा छठपूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाण प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. या सणाला चार महिने बाकी असताना सुद्धा उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झालेल्या आहे.

रेल्वे गाड्या हाऊसफुल
रेल्वे गाड्या हाऊसफुल
author img

By

Published : Jul 28, 2021, 6:52 PM IST

Updated : Jul 28, 2021, 8:04 PM IST

मुंबई - दरवर्षी छठपूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबई आणि उपनगरात काम करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशात जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता असताना सुद्धा छठपूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाण प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. या सणाला चार महिने बाकी असताना सुद्धा उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झालेल्या आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या नियमित मेल-एक्स्प्रेस गाड्या बहुतांश वेटिंग लिस्ट ५० च्या पुढे गेले आहे.

एकूण ४६ ट्रेन प्रति दिवस धावतात -
देशात सर्वत्रच उत्तर भारतीय छठपूजा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये हा सण साजरा केला जातो. विशेष म्हणजे दिवाळी सुटयांमध्ये छठपूजा येत असल्याने मुंबईतील मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक या पूजेला गावी जातात. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा केला होता. मात्र, यंदा दिवाळी आणि छठपूजा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. विशेष म्हणजे, यंदा ४ नोव्हेंबरला दिवाळी तर छठपूजा उत्सव हा १० नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत मुंबईतून उत्तर प्रदेशाला जाणाऱ्या रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहे. नियमित धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या बहुतांश वेटिंग लिस्ट ५० च्या पुढे गेले आहे. मुंबई ते लखनऊ दरम्यान एकूण ४६ ट्रेन प्रति दिवस धावतात. या सर्व गाड्यामध्ये दिवाळी आणि छठपूजा उत्सवादरम्यान गर्दी असते.

या गाड्यांचे आरक्षण फुल्ल -
ट्रेन क्रमांक 01015 खुशीनगर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 05159 छपरा दुर्ग स्पेशल एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 15068 बांद्रा टर्मिनस-गोरखपुर एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 02538 एलटीटी गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 05068 बांद्रा टर्मिनस-गोरखपुर उद्घाटन विशेष एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 02103 एलटीटी गोरखपूर सुपर फास्ट एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 12534 पुष्पक एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 02598 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोरखपुर स्पेशल एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 22121 मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस - लखनऊ वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 05066 लखनऊ छपरा स्पेशल, ट्रेन क्रमांक 12107 लखनऊ सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 15066 पनवेल - गोरखपुर एक्सप्रेसच्या गाड्या फुल्ल झाल्या असून आता वेटिंग लिस्ट लागली आहे.

उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या रेल्वे गाड्या प्रतीक्षा यादीत -
२ नोव्हेंबर २०२१ रोजी सुटणारी ट्रेन क्रमांक 05066 लखनऊ छपरा स्पेशल एक्स्प्रेस हाऊसफुल झाली आहे. सध्या या गाडीचे प्रतीक्षा यादी सुरु झाली आहे. ज्यामध्ये सेकंड सिटींग १, एलएस ४३, एसी ३- सात, आणि एसी २ - पाच इतका आहे. तर 02103 एलटीटी गोरखपुर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणाची प्रतीक्षा यादी सुरु झाली आहे. सध्या या गाडीचे सेकंड सिटींग २, एसएल ४०, एसी ३- ४, आणि एसी २ - १ आहे. तर मुंबईतून बिहारला जाणाऱ्याही रेल्वे गाड्या सुद्धा प्रतीक्षा यादीत गेले आहे. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक 02141, लोकमान्य टिळक पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाडीचे एसएल १८९, एसी ३- ६६ आणि एसी २ - ३१, ट्रेन क्रमांक लोकमान्य टिळक राजेंद्रनगर एक्स्प्रेस या गाडीचे एसएल ६५ , एसी ३- १८, आणि एसी २ - ११, आणि लोकमान्य टिळक भागलपूर एक्स्प्रेस सेकंड सिटींग ४३०, एसएल १३०, एसी ३ - ३२, आणि एसी २ १४ इतकी प्रतीक्षा यादी आहे.

फेस्टिवल विशेष गाड्या सोडणार -
मध्य रेल्वेच्या अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा, दिवाळी आणि छठ पूजाच्या निमित्ताने दरवर्षी देशभरात प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत म्हणून विशेष गाड्या चालविण्यात येतात. यंदा सुद्धा सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यात या गाडयांची घोषणा होऊ शकते, मुंबईतून दसरा, दिवाळी आणि छठ पूजेसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाचे लक्षात घेऊन फेस्टिवल विशेष गाड्या चालवण्याची योजना आखणार आहे.

हेही वाचा - दिलासादायक! बँकेवर निर्बंध लागू झाले तरी ठेवीदाराला 90 दिवसांमध्ये मिळणार पैसे

Last Updated : Jul 28, 2021, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.