ETV Bharat / city

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या कामासाठी वाहतूक बंद;आरे कॉलनीत वाहतूक कोंडीची शक्यता

महाविकास आघाडी सरकारने आरे कॉलनीतील ( Aarey Colony Mumbai ) कार शेडला स्थगिती दिल्यानंतर नव्याने आलेले शिंदे सरकारने सर्व स्थगिती उठवल्यानंतर पुन्हा मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाकाला ( Goregaon Check Naka to Marol Naka ) जोडणारा आरे कॉलनीमधील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी 24 तासांसाठी मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) पूर्ण बंद केला आहे.

Traffic shut down for Mumbai Metro work
मुंबई मेट्रोच्या कामासाठी वाहतूक बंद
author img

By

Published : Jul 25, 2022, 1:31 PM IST

Updated : Jul 25, 2022, 1:54 PM IST

मुंबई- राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा आरे कार शेड प्रकरणावरून ( The saw car shed case ) राज्य सरकार आणि पर्यावरण प्रेमी यांच्यामध्ये आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कॉलनीतील कार शेडला स्थगिती दिल्यानंतर नव्याने आलेले शिंदे सरकारने या सर्व स्थगिती उठवल्यानंतर पुन्हा मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. याला पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाहतूक पोलिसांकडून परिसरात वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुंबई मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद - मुंबई उपनगर वाहतूक पोलीस ( Mumbai Suburban Traffic Police ) उपआयुक्त यांनी परिपत्रकात असे म्हटले आहे की, मुंबईतील गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाकाला जोडणारा आरे कॉलनीमधला मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्ण बंद केला आहे. आज सकाळपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी 24 तासांसाठी बंद ( Road closed to traffic for 24 hours ) असणार आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याचे कारण मुंबई वाहतूक पोलिसांनी दिले आहे.

वाहतूक कोंडी होण्याची शक्यता - हा मार्ग बंद असल्याने आरे मार्गे पवईला जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याच्या परिणामी आता पवईला जाण्यासाठी जेव्हीआरएल मार्गांवरून जावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरे कॉलनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आरे कॉलनीतील मार्ग वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.

या पूर्वी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे ( Shinde government ) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबई मेट्रो 3 कारशेड ( Mumbai Metro 3 Carshed ) आरे कॉलनीत स्थलांतरित ( Migrated to Aarey Colony ) करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ( MNS leader Amit Thackeray ) यांनी नव्याने स्थापन झालेल्या सरकारला या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा : Nawab Maliks Bail Application : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाची उद्या होणार सुनावणी

Last Updated : Jul 25, 2022, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.