मुंबई - शहरातील रस्ते वाहतुकिसाठी महत्त्वाचा असलेला सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम आज सकाळी पाच वाजल्यापासून हाती घेण्यात आले आहे. यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडे येणारी व मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनाच्या रांगा या परिसरात मोठ्या प्रमाणात लागल्या असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
पूर्व उपनगरातील सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापासून रखडले होते. हा पूल जड वाहनांसाठी धोकादायक असल्याने त्यावरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, छोट्या व हलक्या वाहनासाठी पुलावरून वाहतूक सुरळीत चालू होती. आज एमएसआरडीसीने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून यात पूलाचे बेरिंग बदलण्याचे काम आठवड्यातील चार दिवस केले जाणार असून ही दुरुस्ती 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे.