ETV Bharat / city

Top 10 @ 7 AM : सकाळी सात वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - Top Ten News

राज्यासह देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top Ten News
टॉप टेन
author img

By

Published : Feb 16, 2021, 7:18 AM IST

औरंगाबाद - राज्यात अनेक ठिकाणी राजकीय मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सोबत घेऊन याबाबत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लोक वापर मास्क वापरत नाही. त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, हे सर्व गांभीर्याने घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

सविस्तर वृत्त - राजकीय पक्षांच्या मेळाव्यांबाबत निर्णय घ्यावा लागेल - अजित पवार

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात २ ते 3 हजारांवर असलेली रुग्णसंख्या ४ हजारांवर गेली आहे. तर मुंबईत ३०० च्या आसपास असलेली रुग्णसंख्या ६०० च्या वर गेली आहे. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये वाढलेली गर्दी आंणि नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दरम्यान वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आढाव बैठक बोलावली असून त्यात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर वृत्त - 'ईटीव्ही भारत' विशेष - कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक

नागपूर - सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणात माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ट्विटमागे असणाऱ्या भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नाव प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, तपास सुरू असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयातून बाहेर पडताना गृहमंत्री माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वृत्त - सेलिब्रिटी ट्विट प्रकरण : भाजप आयटी सेलप्रमुख आणि 12 सोशल इन्फ्लून्सरचे नावं समोर - गृहमंत्री

मुंबई - राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. रविवारी 4092 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात काही प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. आज(15 फेब्रुवारी) 3365 नवे रुग्ण आढळून आले असून, 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त - राज्यात सोमवारी 3365 नवीन कोरोनाबाधित; 23 मृत्यू

बीड - नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांचे एक पथक सोमवारी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणातील संशयित शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच झडती घेतली. तसेच त्याच्या नातेवाईकांची चौकशीही केली.

सविस्तर वृत्त - प्रजासत्ताक दिन हिंसा प्रकरण : बीडच्या शंतनू मुळूकच्या घराची दिल्ली पोलिसांकडून झडती

परळी (बीड) - येथील बंजारा समाजाची युवती पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. यानंतर सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान, पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझा कोणावरही संशय नाही. सोशल मीडियावरील आमची बदनामी थांबवावी," असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटले आहे.

सविस्तर वृत्त - माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी; पूजाच्या वडीलांचे आवाहन

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर वनमंत्री संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे राठोड नेमके गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. या प्रकरणावर कोणतीही कारवाई न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बोट दाखवले जात आहे. आता या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालणार असून आज (१६ फेब्रुवारी) वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त - पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची आज वर्षावर बैठक

इंदूर - भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझाने जवळपास दोन दशके घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर क्रिकेटच्या सर्व प्रारूपातून निवृत्तीची घोषणा केली. मध्यप्रदेशच्या ओझाने भारतासाठी एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. रणजी स्पर्धेत यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी (३५१) घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

सविस्तर वृत्त - भारतासाठी दोन टी-२० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खानने आपल्या अभिनेता वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जुनैदने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून त्याचे नाव महाराजा असे आहे.

सविस्तर वृत्त - आमिर खानचा मुलगा जुनैदने 'महाराजा' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात!!

मुंबई - सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान आणि जॉन्टी होड्स या दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पुन्हा प्रारंभ होत आहे. या मालिकेत दोन नव्या संघाची 'एन्ट्री' झाली आहे. इंग्लंड लेजेंड्स आणि बांगलादेश लेजेंड्स अशी या दोन नव्या संघांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : दोन नव्या संघांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.