आज दिपावली. लक्ष्मीपुजनाचा दिवस. सर्वत्र एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण
दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी होणारी दिवाळी यंदा 4 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. दिवाळी हा देवी लक्ष्मीला समर्पित केलेला सण आहे. या दिवशी उपासक समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. बहुतेक हिंदू कुटुंबे दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांनी आणि अशोक, आंबा आणि केळीच्या पानांनी त्यांची घरे आणि कामाची जागा सजवतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि घरांमध्ये समृद्धी, संपत्ती आणि सद्भावनेसाठी तिची पूजा केली जाते.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्या, उच्च न्यायालयाचे कामगार संघटनांना निर्देश
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. दिवाळीच्या तोंडावर विविध कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता कामगार संघटनांनी पुढील आदेशापर्यत संप मागे घ्यावा , असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देणार, श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ धामच्या यात्रेवर जाणार आहेत. केदारनाथ धाम येथे पूजाअर्चना केल्यानंतर ते श्री शंकराचार्य समाधीचे तसेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. याबरोबरच ते वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून निर्णय होणार लागू
दिवाळीनिमित्त केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेला मोठं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केलीय. या कपातीनंतर आता देशात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी होणार आहेत. उद्या सकाळपासून नवीन दर लागू होतील. सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी 100 रुपयांचा टप्पा ओलांडलाय.
राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक
भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाली असून आता राहुल द्रविड या पदाची सर्व सूत्र सांभाळणार आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी राहुल द्रविडकडे पदभार देण्यात येणार आहे. राहुल द्रविडनेही मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो टीम इंडियात सामील होईल, असेही म्हटले जात आहे. द्रविडच्या अफाट अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होईल.
टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय
टी 20 विश्वचषक स्पर्धेत आजचा सामना भारत विरुध्द अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. भारताने या स्पर्धेत पाकिस्तान व न्यूझिलंड या संघाकडून दोनदा पराभव पत्करल्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान अफगाणीस्तानने टॉस जिंकला असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार मोहम्मद नबी याने घेतला आहे.
नविर्वाचीत खासदार कलाबेन डेलकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. रम्यान खासदार कलाबेन डेलकर आणि त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
कालच्या महत्वाच्या बातम्या
आयकर विभागाची अजित पवारांना नोटीस नाही, वकिलांचे स्पष्टीकरण
अजित पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवली असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या वृत्ताचे अजित पवार यांच्याकडून खंडन करण्यात आल आहे. अजित पवार यांचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी आयकर विभागाकडून आलेल्या नोटीचीचे खंडन केले आहे.
जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन
जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे आज मंगळवार (दि. ३)रोजी येथील जयसिंगपूरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. जाधव यांनी सुमारे ५० वर्ष महाराष्ट्रात फिरून शस्त्रांचा मोठा साठा निर्माण केला होता. यामध्ये शस्त्रास्त्रे आणि प्रात्यक्षिके हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.
पाकिस्तानची विजयी घोडदौड कायम! नामिबियाला नमवून सेमीफायनलमध्ये धडक
टी-२० विश्वकरडंक स्पर्धेत मोठ्या फॉर्मात खेळणाऱ्या पाकिस्तानने चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बाबरसेनेने नवख्या नामिबियाला ४५ धावांनी गारद केले. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
पश्चिम बंगालचे माजी मंत्री रवी रंजन चट्टोपाध्याय यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले
पश्चिम बंगालचे माजी मंत्री रवी रंजन चट्टोपाध्याय यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार असून यामध्ये ते त्या त्या जिल्ह्यांची परिस्थिती जाणून घेणार आहेत