ETV Bharat / city

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jan 21, 2022, 5:59 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News in Marathi
Todays Top News in Marathi

आज दिवसभरात -

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना

पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला होता. या विजयासह दक्षिण आफ्रिकाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवशीय सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 ला सामन्यास सुरुवात होईल. दुसऱ्या सामन्यासोबत एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आज आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. तसेच, केएल राहुलच्या नेतृत्वाचा कसही लागणार आहे. ही मालिका खेचून आणल्यास राहुलला कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दावेदारी करता येऊ शकते.

  • अनिल देशमुखांवरील आरोपांवर अंतिम सुनावणीची शक्यता

मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्याप्रकरणी अनिल देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल चौकशी करत आहेत. त्यावर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.

  • शाळा सुरु होण्याबाबत नियमावली जाहीर होणार

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली होती. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल दिलेली. मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजूरी दिली आहे. त्यानंतर 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहे. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. याबाबत आज नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

आजचे राशीभविष्य -

काल दिवसभरात -

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाचे 48 वर्षीय मेहूणे जेसन सॅव्हियो वॅटकिन्स ( Remo Dsouza Brother In Law Suicide ) यांनी मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारलेला Why I Killed Gandhi हा चित्रपट प्रदर्शित होणार ( Amol Kolhe New Movie ) आहे. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला ( Jitendra Awvhad On Amol Kolhe Movie ) आहे. तसेच, सिनेमाला विरोध करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) आता पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नथुराम गोडसेची भूमिका केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना, 'कलाकार आणि राजकीय नेता यांच्यात गल्लत करू नका', अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली ( Amol Kolhe Reacted On Godase Role ) आहे.

आर्वीच्या कदम रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी ( Arvi Abortion Case ) पीसीपीएनडीटी समितीने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. 2 दिवसांत तक्रार दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला दहा दिवसांचा कालावधी का लागल्याने, सवाल उपस्थित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.