ETV Bharat / city

Mumbai Corona Update : बुधवारी 863 नवे रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू - मुंबई नवीन कोरोना रुग्ण

मुंबईत आज 863 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 23 हजार 324 वर पोहचला आहे.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 23, 2021, 8:25 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. गेले काही दिवस 500 च्या आसपास रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात आज वाढ पाहायला मिळत आहे. आज 863 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच रोज 10 पेक्षा कमी मृत्यू होत होते. त्यात आज वाढ झाली आहे. आज 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 728 दिवसांवर पोहचला आहे.

  • रुग्ण दुप्पटीचा कालावधी 728 दिवसांवर -

मुंबईत आज 863 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 23 हजार 324 वर पोहचला आहे. आज 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 338 वर पोहचला आहे. आज 711 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 91 हजार 128 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 577 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 728 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 12 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 88 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 37 हजार 905 तर आतापर्यंत एकूण 69 लाख 11 हजार 526 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

  • रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मे ला 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762, 19 जून ला 696, 20 जून ला 733, 21 जून ला 521, 22 जून ला 570, 23 जून ला 863 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.