मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७४०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१७१० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५९८ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५१८८० रुपये
- दिल्ली - ५१७१० रुपये
- हैदराबाद - ५१७१० रुपये
- कोलकत्ता - ५१७१० रुपये
- लखनऊ - ५२९०० रुपये
- मुंबई - ५१७१० रुपये
- नागपूर - ५१,७८० रुपये
- पुणे - ५२,७८० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६६००० रुपये
- दिल्ली - ५९८०० रुपये
- हैदराबाद - ६६००० रुपये
- कोलकत्ता - ५९८०० रुपये
- लखनऊ - ५९८०० रुपये
- मुंबई - ५९८०० रुपये
- नागपूर - ५९८०० रुपये
- पुणे - ५९८०० रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ : खरे तर रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine) यांच्यात गेल्या १११ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात अस्थिरतेची स्थिती आहे. अशा स्थितीत जगभरात सोन्या-चांदीच्या दरात हालचाली सुरू आहेत.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.