मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. आज मुंबईत 940 रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 940 नवे रुग्ण आढळून आले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 13 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 82 हजार 814 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 791 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 880 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 55 हजार 860 वर गेला आहे. सध्या मुंबईत 13 हजार 157 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 196 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 199 दिवस, तर सरासरी दर 0.35 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 434 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 212 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 18 लाख 71 हजार 125 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२
२२ नोव्हेंबर - ११३५
२३ नोव्हेंबर - ८००
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण
हेही वाचा- पाकिस्तानवर लवकरच तिसरा 'सर्जिकल स्ट्राईक'; भाजपचे नेते सुभाष भामरेंची माहिती