ETV Bharat / city

खराब व्हेंटिलेटर बाबत राजकीय पक्षांनी राजकारण करू नये, औरंगाबाद खडपीठाचे निर्देश

author img

By

Published : May 26, 2021, 8:55 AM IST

Updated : May 26, 2021, 1:32 PM IST

all india news
ताज्या घडामोडी

13:29 May 26

सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडे आजपासून सीबीआयच्या संचालक पदाची सूत्रे

आयपीएस सुबोधकुमार जयस्वाल यांनी आज सीबीआयच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांची दोन वर्षासाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

13:25 May 26

खराब व्हेंटिलेटर बाबत राजकीय पक्षांनी राजकारण करू नये, औरंगाबाद खडपीठाचे निर्देश

औरंगाबाद - पंतप्रधान मदत निधीमधून प्राप्त झालेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्यावरून विविध राजकीय व्यक्तींनी घाटी रुग्णालयाला भेट देऊन मत व्यक्त करत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येऊ नये, असे मत न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी व्यक्त केले आहे.
 
13:24 May 26

महाविकास आघाडी सरकार मधील प्रत्येक खात्याचा भ्रष्टाचार मी पुराव्यानिशी समोर आणेन - नारायण राणे

मुंबई - कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केलं? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात पॅकेज का जाहीर केला नाही असा सवाल करत नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौरा नुसता फेरफटका आणि नौटंकी दौरा असल्याचे भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यांमध्ये सध्या भ्रष्टाचार सुरू असून तो पुराव्यानिशी समोर आणण्याचा इशाराही या वेळेस नारायण राणे यांनी दिलेला आहे.
 
12:50 May 26

शिवसेना आमदार संजय गायकवाडांचे घरासमोरील वाहन जाळण्याचा प्रयत्न..

बुलडाणा- गेल्या काही दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या घरापुढे लावण्यात आलेली इनोव्हा वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला.

12:47 May 26

दिल्ली सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांनी आज पाळला काळा दिवस

किसान मोर्चा संघाने आज काळा दिवस साजरा केला. शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू करून आज सहा महिने पूर्ण झाले. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज काळा दिवस पाळला.

12:41 May 26

मुंबईत कॉंग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध; लस तुटवड्यावरून निशाणा

पंतप्रधान मोदींनी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली, असा सवाल करत मुंबईतील कॉंग्रेस नेत्यांनी दहिसर चेकनाक्याजवळ निषेध आंदोलन केले. आज सकाळी दहावाजता दहिसर चेकनाका, मुंबई चेक नाका जवळ, कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी हातात पोस्टर देशात सध्या कोरोना लसीचा तुडवडा निर्माण होण्यास मोदी सरकार कारणीभूत आहे. आमच्या मुलांची लस परदेशात का विकली ? असा सवाल या आदोलकांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. 

12:19 May 26

व्हाटसअॅपची केंद्रसरकार विरोधात न्यायालयात धाव

व्हाट्सने भारत सरकारच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. केंद्र सरकारने नवीन आयटी नियमानुसार देण्यात आलेली मुदत मंगळवारी संपली आहे. त्यापार्श्वभूमीवर व्हाटसअॅपने न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांची माहिती देऊ शकत नसल्याचे व्हॉटस्अॅपने म्हटले आहे.

12:13 May 26

अनिल देशमुख प्रकरण : राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी ८ जून पर्यंत तहकूब

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा प्रकरणात, एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी 8 जूनपर्यंत तहकूब कऱण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ नियमित कोर्टात सुनावणी करणार आहे. 

आजच्या सुनावणीत "ही सुनावणी दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करायची आहे का?"  तसेच यास सीबीआयचा हस्तक्षेप आहे अशी विचारणा न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांनी केली. मूळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून खटला त्यांच्याकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. 

11:57 May 26

ओडिशाच्या किनारपट्टीवर लाटांचे तांडव; समु्द्राच्या पाण्याचा गावात शिरकाव

भुवनेश्वरच्या विभागीय हवामान विज्ञान केंद्राचे अधिकारी डॉ. उमाशंकर दास यांनी यास चक्रीवादळ हे ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील धमरा आणि चांदबालीच्या मध्ये धडकणार असल्याची माहिती दिली.  तर धमरा जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात समुद्राचे पाणी गावात शिरले आहे.

11:48 May 26

उजनीच्या पाण्याचा वाद थेट शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानावर; इंदापूरचे आंदोलक ताब्यात

उजनीच्या पाण्याचा वाद
उजनीच्या पाण्याचा वाद

बारामती- इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी तालुक्यातील दुष्काळग्रस्त २२ गावांना देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला आहे. या निषेधार्थ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
 
11:36 May 26

बारा आमदारांच्या यादी प्रकरणी राज्यपालांच्या भूमिकेची नारायण राणेंकडून पाठराखण

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यावर राजभवनाकडून ती यादीच सापडत नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. मात्र राज्यपालांकडून त्या यादीवर निर्णय न घेण्याच्या भूमिकेची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाठराखण केली आहे. 

10:26 May 26

चक्रीवादळ यास आज ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार

कोलकाता/भुवनेश्वर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले यास चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ओडिशाच्या भद्रक जिल्हा आणि धामराच्या उत्तर, तसेच बालासोरच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार हे वादळ ताशी 130- 140 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.   

10:06 May 26

..त्यामुळे राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार? मंत्री अस्लम शेख यांचे संकेत

मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यात टप्प्याने वाढ करत तो १ जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात सध्या कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अनलॉक होणार की आणखी यात वाढणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. मात्र, मुंबई पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले आहेत. 
 
06:04 May 26

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार; ८ जून पासून नियोजन

अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांना मुहूर्त मिळाला आहे. विद्यापीठाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आता आठ जूनपासून परीक्षा घेण्यात येणार आहेत. हिवाळी सत्राच्या परीक्षेत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  महाविद्यालय स्तरावर या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली

Last Updated : May 26, 2021, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.