ETV Bharat / city

अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक ठरवणार रणनीती; अकरा वाजता बैठक - विरोधी पक्षाची बैठक

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची आज दुपारी ११ वाजता बैठक होणार आहे.

विधीभवन
author img

By

Published : Jun 16, 2019, 10:20 AM IST

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज दुपारी ११ वाजता होत आहे. या बैठकीत सरकारला अधिवेशनात विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्यासाठी आणि एकाच वेळी दोन्ही सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करायचे यावर रणनीती ठरवली जाणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील B-४ या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. बैठकीला विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही यावर बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना राज्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र, तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडून राज्यातील जनमानसात आपली पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः या अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षणातील वाढलेली अनागोंदी, धनगर आणि इतर समाजातील आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासारख्या अनेक प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. त्याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी ही बैठक महत्वाची असणार आहे.

Intro:अधिवेशांत सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक ठरविणार रणनीती; अकरा वाजता बैठकBody:अधिवेशांत सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक ठरविणार रणनीती; अकरा वाजता बैठक

(फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई ता.16 :
सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस - कॉंग्रेस व इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज दुपारी होत आहे. या बैठकीत सरकारला या अधिवेशनात विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्यासाठीची आणि एकाच वेळी दोन्ही सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करायचे यावर रणनीती ठरवली जाणार आहे.
ही बैठक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील B - 4 या शासकीय निवासस्थानी सकाळी अकरा वाजता होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे , या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना राज्यात म्हणावे असे यश मिळाले नसले तरीही त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सरकारला कोंडीत पकडून राज्यातील जनमानसात आपली पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे.विशेषतः या अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, बेरोजगारी, ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, शिक्षणातील वाढलेली अनागोंदी, धनगर आणि इतर समाजातील आरक्षणाचे रखडलेले प्रश्‍न आदी अनेक प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांना मिळाली असून त्याचा लाभ कसा घ्यायचा यावर ही बैठक महत्वाची असणार आहे.Conclusion:अधिवेशांत सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक ठरविणार रणनीती; अकरा वाजता बैठक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.