मुंबई - दरवर्षी 10 डिसेंबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारले. ( Declaration of Human Rights December 10, 1948 ) त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 1950 मध्ये 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला. हे घोषणा पत्र जगभरातल्या 500 पेक्षा जास्त भाषांत अनुवादीत आहे.
मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने एक घोषणा पत्र जाहीर केले
जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी 1950 सालापासून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अस संयुक्त राष्ट्रसंघटने स्पष्ट केले होते. ( Human rights are built around the principles of equality and non-discrimination. ) या दिवसासाठी 10 डिसेंबर हीच तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे 1948 साली याच दिवशी जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने एक घोषणा पत्र जाहीर केले होते.
शाश्वत विकासांच्या मुद्द्यात मानवाधिकारांना केंद्रस्थानी ठेवण्याची आवश्यकता
या वर्षीची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाची थीम ( Recover Better, Stand Up For Human Rights ) ही आहे. ही थीम कोरोनाशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिया गुटेरस यांनी आपल्या एका संदेशात सांगितले आहे की कोरोनाशी लढा देताना तसेच लैंगिक समानता वातावरण बदल आणि शाश्वत विकासांच्या मुद्द्यात मानवाधिकारांना केंद्रस्थानी ठेवण्याची आवश्यकता आहे.
जगातला प्रत्येक मनुष्य स्वतंत्रता, समानता आणि सन्मानाचा हक्कदार आहे
मानवाधिकार हा जगभरातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यांदींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाहीत असं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे. जगातला प्रत्येक मनुष्य स्वतंत्रता, समानता आणि सन्मानाचा हक्कदार आहे असंही सागितले आहे. ( Why Human Rights Day is celebrated ) मानवाधिकांरांच्या घोषणा पत्रात असं म्हटलंय की कोणात्याही मनुष्याला गुलामीत ठेवता येणार नाही. कोणालाही शारीरिक यातना देता येणार नाहीत. कोणाप्रती निर्दयता किंवा अमानवीय आणि अपमानजनक व्यवहार करता येणार नाही. जगातल्या प्रत्येकाला कायदेशीररित्या मानवी हक्काचा अधिकार आहे.
मानवी हक्क दिवस का साजरा करतात ?
समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. ( Freedom of expression Human Rights Day 2021 ) मानवाधिकारांच्या घोषणापत्रात एकूण ३० कलमे असून या घोषणापत्रावर आधारित मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. १९७६ मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सर्वात प्रथम जगातील ४८ देशांनी हा दिवस साजरा केला.
भारतातही मानवी हक्क कायदा लागू झाला
भारतात २८ सप्टेंबर १९९३ला मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर १२ ऑक्टोबर १९९३ मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. हा आयोग राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या कार्यक्षेत्रांतही लागू करण्यात आला.
मानवी हक्क म्हणजे काय?
- मानवी हक्क म्हणजे सर्व मनुष्याला प्राप्त झालेले असे मुलभूत अधिकार, जे त्याच्या राष्ट्रीयत्व, निवास, लिंग, जात, वर्ण, धर्म, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसते. यामध्ये कुठल्याही प्रकराचा भेदभाव नसतो.
मुलभूत मानवी हक्क कोणते ? - 1 अभिव्यक्ती स्वातंत्र्य
- 2 मतदान करण्याचा तसेच निवडणूक लढवण्याचा अधिकार
- 3 प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आणि सुरक्षेचा अधिकार
- 4 शिक्षणाचा अधिकार
- 5 कायद्यासमोर समानतेचा अधिकार
अशाप्रकारचे एकूण 5 अधिकार आपल्याला मुलभूत मानवी हक्कांद्वारे प्राप्त झालेले आहेत.
राज्य सरकारकडून मानव अधिकारांचे हनन अनिल गलगले
सर्वसामान्यांना मिळविण्याकरिता मानव अधिकार ची स्थापना करण्यात आली आहे मात्र राज्यातील मानवाधिकार मंडळ सदस्य आणि अध्यक्ष बिना खाली आहे आतापर्यंत मानव अधिकार कार्यालयामध्ये बावीस हजाराच्या वरती तक्रारी आलेले आहे मात्र तरी देखील राज्य सरकार आणि राजकीय पक्षांकडून या आयोगाचा हनन केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले आहे.
हेही वाचा - PM Paid Homage to Bipin Rawat : पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रध्दांजली