ETV Bharat / city

President election results : मुर्मू, सिन्हा यांच्यातून कोण होणार राष्ट्रपती? आज आहे निकाल

आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल ( President election results ) लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू ( President election Draupadi murmu ) आणि विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्र यशवंत सिन्हा ( President election Yashwant Sinha ) हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

president election result 2022
राष्ट्रपती पद निवडणूक निकाल
author img

By

Published : Jul 21, 2022, 6:59 AM IST

मुंबई - आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल ( President election results ) लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू ( President election Draupadi murmu ) आणि विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्र यशवंत सिन्हा ( President election Yashwant Sinha ) हे निवडणुकीच्या रिंगणात होते. देशातील आमदार, खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. सत्ताधारी भाजप आघाडीकडे 50 टक्क्यांहून अधिक मते असल्याने द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

हेही वाचा - केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान पोहोचले मथुरेत.. बांके बिहारी मंदिरात घेतले दर्शन

द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा यांच्यातून कोण जिंकणार? - राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. भारतातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हेच केंद्र सरकारचे प्रमुख असतात. या पदासाठी 18 जुलैला देशभरात मतदान झाले. लोकसभा, विधानसभेतील खासदार तसेच, देशातील विविध राज्यांतील विधिमंडळातील आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत. तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यातील आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांचा विजय होईल असे मानले जात आहे.

'हे' आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार -

द्रौपदी मुर्मू - मुर्मू यांचा ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात जन्म झाला होता. त्या आदिवासी संथाल कुटुंबातील आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शिक्षक म्हणून केली. त्यानंतर कारकून म्हणून काम केले. 1997 मध्ये त्या नगरसेवक झाल्या. सन 2000 ते 2009 मध्ये मयूरभंजच्या रायगंज मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. तर, 2015 मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या.

यशवंत सिन्हा - सिन्हा 6 नोव्हेंबर 1937 रोजी पाटण्यातील कायस्थ कुटुंबात जन्म झाला होता. 1960 मध्ये ते जिल्हाधिकारी झाले होते. सन 1984 मध्ये आयएएस पदाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 1998, 1999, 2009 मध्ये हजारीबागमधून ते भाजपचे खासदार होते. नोव्हेंबर 1990 ते जून 1991 या काळात चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा - Ajmer student missing in England : अजमेरचा सुजल इंग्लंडमध्ये समुद्राच्या लाटेत झाला बेपत्ता..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.