ETV Bharat / city

मुंंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच, आज 823 कोरोनाबाधितांची नोंद - मुंबई कोरोना लेटेस्ट न्यूज

मुंबईत आज 823 कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 17 हजार 310 वर पोहोचला आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 435 वर पोहोचला आहे. तर 440 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 98 हजार 435 वर पोहोचली आहे.

मुंंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

author img

By

Published : Feb 19, 2021, 8:51 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊन, दिवसाकाठी 300 ते 400 एवढी कमी झाली होती. मात्र पुन्हा एकदा आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736 तर आज मुंबईत तब्बल 823 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबईत आज 823 कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 17 हजार 310 वर पोहोचला आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 435 वर पोहोचला आहे. तर 440 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 98 हजार 435 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 6577 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 393 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 57 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 321 इमारतीमध्ये रुग्ण आढळून आल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 98 हजार 894 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

'हे' विभाग आहेत हॉटस्पॉट

मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात कोरोनाचे नियम पाळण्यात यावेत यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात असून, याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने सोसायट्यांना नोटीसा देखील पाठवण्यात आल्या आहेत.

या दिवशी वाढली रुग्ण संख्या

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, काल 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721 तर 18 फेब्रुवारीला 736 तर आज 823 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.