मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज बुधवारी १ सप्टेंबर रोजी ४४५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज मृत्यूसंख्या वाढली असून, १८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ४,४३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५१,०७८ सक्रिय रुग्ण -
राज्यात ४,४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७७,२३० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के एवढे झाले आहेत. राज्यात ४४५६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १८३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,४९६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४१ लाख ५४ हजार ८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६९ हजार ३३२ (११.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९० हजार ४२७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५१,०७८ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार -
गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर वाढला, २.१२ टक्के -
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९, २७ ऑगस्टला १७०, २८ ऑगस्टला १२६, २९ ऑगस्टला १३१, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर वाढला असून, तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४१५
रायगड - ६२
पनवेल पालिका - ६६
अहमदनगर - ६५३
पुणे - ६०८
पुणे पालिका - ३२४
पिपरी चिंचवड पालिका - १६७
सोलापूर - ३६७
सातारा - ५४८
कोल्हापूर - ६४
सांगली - २१२
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ३८
सिंधुदुर्ग - ७३
रत्नागिरी - १२५
उस्मानाबाद - ५८
बीड - ७९