ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, रविवारी 3775 कोरोनाबाधितांची नोंद - Mumbai Corona Latest News

मुंबईत आज सर्वाधिक 3775 रुग्ण आढळून आल्याने, कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 62 हजार 654 वर पोहोचला आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांचा आकडा 11 हजार 583 वर पोहचला आहे. तर 1647 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा 3 लाख 26 हजार 708 वर पोहोचला आहे.

रविवारी 3775 कोरोनाबाधितांची नोंद
रविवारी 3775 कोरोनाबाधितांची नोंद
author img

By

Published : Mar 21, 2021, 8:16 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 20 मार्चला शनिवारी 2 हजार 982 रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी आज तब्बल शहरात 3775 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत आज सर्वाधिक 3775 रुग्ण आढळून आल्याने, कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 62 हजार 654 वर पोहोचला आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांचा आकडा 11 हजार 583 वर पोहचला आहे. तर 1647 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा 3 लाख 26 हजार 708 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 23 हजार 448 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 106 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 40 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 316 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 37 लाख 11 हजार 103 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हे विभाग आहेत हॉटस्पॉट -

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे, या विभागात महापालिकेकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.

अशी वाढली रुग्ण संख्या

मुंबईत 6 जानेवारीला 795, त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645 रुग्ण आढळून आले होते त्यात वाढ होऊन 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1121, 4 मार्चला 1103, 5 मार्चला 1173, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 8 मार्चला 1008, 9 मार्चला 1012, 10 मार्चला 1539, 11 मार्चला 1508, 12 मार्चला 1646, 13 मार्चला 1708, 14 मार्चला 1962, 15 मार्चला 1712, 16 मार्च 1922, 17 मार्चला 2377, 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी झाली कमी रुग्णांची नोंद

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.