मुंबई - राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोनाबाधितांमध्ये घट झाली आहे. काल राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही 40 हजारांपेक्षा जास्त होती. आज त्यामध्ये घट झाली आहे. मात्र तरी देखील राज्यात आज 31 हजार 643 रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना स्थिती
राज्यात आजा नव्या 31,643 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 27 लाख 45 हजार 518 वर पोहोचला आहे. तर 20 हजार 854 जणांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनामुक्तांचा आकडा हा 23 लाख 53 हजार 307 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 3 लाख 36 हजार 584 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील मृत्यू दर हा 1.98 टक्के एवढा आहे.
राज्यातील या भागात आहेत सर्वाधिक कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिका- 5890
ठाणे- 544
ठाणे मनपा- 1010
नवी मुंबई-598
कल्याण डोंबिवली- 934
मीराभाईंदर-283
वसई विरार मनपा-191
रायगड-145
पनवेल मनपा-329
नाशिक-825
नाशिक मनपा-1892
अहमदनगर- 825
अहमदनगर मनपा-470
धुळे- 256
धुळे मनपा - 127
जळगाव- 684
जळगाव मनपा- 199
नंदुरबार-377
पुणे- 937
पुणे मनपा- 2554
पिंपरी चिंचवड- 1481
सोलापूर- 332
सोलापूर मनपा- 121
सातारा - 460
सांगली- 144
औरंगाबाद मनपा-803
औरंगाबाद-126
जालना-256
परभणी -217
लातूर मनपा-206
लातूर 183
उस्मानाबाद-323
बीड -398
नांदेड मनपा-678
नांदेड-330
अकोला मनपा-115
अमरावती-301
अमरावती मनपा- 128
यवतमाळ-303
बुलडाणा-435
वाशिम - 426
नागपूर- 962
नागपूर मनपा-2281
वर्धा-264
भंडारा-239
गोंदिया- 124