ETV Bharat / city

मुंबईत शनिवारी 2678 कोरोनाबाधितांची नोंद, 62 रुग्णांचा मृत्यू - कोरोना रुग्ण संख्येत घट मुंबई

मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज 2678 नवे रुग्ण आढळून आले असून, 62 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 3608 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : May 8, 2021, 8:37 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज 2678 नवे रुग्ण आढळून आले असून, 62 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 3608 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 145 दिवसांवर

मुंबईत आज 2 हजार 678 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 74 हजार 072 वर पोहोचला आहे. आज 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 749 वर पोहोचला आहे. तर 3 हजार 608 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 10 हजार 043 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 48 हजार 448 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 145 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 93 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 581 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 33 हजार 378 तर आतापर्यंत एकूण 56 लाख 77 हजार 780 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग आहेत हॉटस्पॉट

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण संख्या आढळून आली होती. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192, 30 एप्रिलला 3925, 1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी झाली सर्वात कमी रुग्णांची नोंद

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते.

हेही वाचा - पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुंबईकर मोफत लसीपासून वंचित; भाजप खासदाराचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.