मुंबई : जंगलाचा राजा आता मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Tiger Sanjay Gandhi National Park Borivali) लवकरच दिसणार आहे. हा सिंह गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात (Lion Sakkarbagh Park Junagadh) असलेला नर सिंह आहे. मादी सिंहांच्या जोडीच्या (आशियटिक लॉयन ) बदल्यात (Tigers And Lions Exchange Maharashtra) बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांनी आज दिली. गुजरातचे वन राज्य मंत्री जगदीश विश्वकर्मा आणि सुधीर मुनगंटीवार (Jagdish Vishwakarma and Sudhir Mungantiwar visit) यांच्यात आज सोमवारी 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे बैठकीत चर्चा झाली (Vishwakarma and Mungantiwar visit Ahmedabad).
मंत्री मुनगंटीवार आणि विश्वकर्मा यांच्यात चर्चा - ह्या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली कडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी कायदेशीर रीतीने कार्यवाही सुरू केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबरला सविस्तर बोलणी केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.