मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर ( Shiv Sena bow and arrow symbol frozen ) तीन नव्या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला ( Election Commission ) द्यावा लागाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून तलवार, तुतारी आणि गदा या तीन चिन्हांचे पर्याय सूचवले आहेत. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी ( Andheri byelection ) चिन्हांचा निर्णय आयोगाकडून घेतला जाणार आहे.
आपापल्या गटांसाठी तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यात आली : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांच्यावतीने पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून नावे आणि चिन्हांवर दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करून दोघांनाही सोमवारपर्यंत आपापल्या गटांसाठी तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले. त्यानुसार दोन्ही गटांकडून पर्यायी चिन्हे निवडण्यात आली आहेत.
चिन्ह आणि नावाचा आज निर्णय : शिंदे यांच्या गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार ही तीन निवडणूक चिन्हे शिंदे गटाच्या कार्यकारिणी बैठकीत सुचवण्यात आली आहेत. सोमवारी मुख्य निवडणूक आयोगाकडे ती सुपूर्द केली जाणार आहेत. शिवसेनेच्या नावाबाबतही तीन सूचना दिल्या असून 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब - धर्मवीर आनंद दिघे, शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय दिल्याचे समजते. निवडणूक आयोगाकडून यापैकी एक चिन्ह आणि नाव देणार आहे.