मुंबई - मुंबई सायन अँटोप हिल महाराष्ट्र नगर येथील 3 घरे आज सकाळी कोसळली. याठिकाणी ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढून सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्या पैकी 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
घर कोसळले -
मिळालेल्या माहितीनुसार सायन अँटोप हिल महाराष्ट्र नगर येथील तळ अधिक एक मजली असलेली 3 घरे आज सकाळी कोसळली. घर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. मुंबई अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 7 जणांना सायन रूग्णालयात पाठवण्यात आले. या सातही जणांना डॉक्टरांनी तपासून त्यामधील 3 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 2 जणांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. अमित मिश्रा 23 वर्ष, सुरेंद्र मिश्रा 59 वर्ष, पूनम शर्मा 28 वर्ष अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर ओपीडीमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
घराचे सेफ्टी ऑडिट
जे घर कोसळले आहे ते आधीच जीर्ण अवस्थेत होते. त्या घराचे सेफ्टी ऑडिट झाले की नाही हे तपासले जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सेफ्टी ऑडिट झाल्यास कारवाई केली जाईल. जेव्हा घर कोसळले तेव्हा सगळे घाबरल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ज्यांची घरे जीर्ण अवस्थेत आहेत अशा जमीनदारांना BMC सल्ला देते. मात्र याप्रकरणी अद्याप कोणीही काही बोलण्यास तयार नाही. सध्या संपूर्ण लक्ष मदत आणि बचाव कार्यावर केंद्रित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघातास जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
हेही वाचा - पुण्यातील पिसोळे येथे फर्निचर गोडाऊनला आग; सर्व साहित्य जाळून खाक