ETV Bharat / city

Extortion Case : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाने 50 लाखाची खंडणी; तिघांना सुरतमधून अटक - सूरतमधून तिघांना मुंबई पोलिसांनी केली अटक

डॉन छोटा शकीलच्या नावाने ( Chota Shakil ) एका व्यावसायिकाला 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रिफ बेग मिर्झा, इलियास कपाडिया आणि अस्लम नवीवाला अशी या तिघांची नावे आहेत.

Extortion Case
Extortion Case
author img

By

Published : Aug 1, 2022, 8:18 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तगत छोटा शकीलच्या ( Chota Shakil ) नावाने 50 लाखाची व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या छोट्या शकीलच्या साथीदारांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरत पोलिसांच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रिफ बेग मिर्झा, इलियास कपाडिया आणि अस्लम नवीवाला, अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही सूरतचे रहिवासी आहेत. सुरतच्या रांदेर पोलिसांचे सहकार्य घेऊन मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. छोटा शकीलसोबत संबंध असल्याचे दाखवून एका व्यावसायिकाकडून 50 लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती पोलीस अधिकार्‍याने दिली आहे.

तक्राररीनुसार दिलेल्या माहितीनुसार त्याने छोटा शकील आरोपीला 13 कोटी रुपये दिले होते. परंतु त्याला पैसे परत करण्याऐवजी आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह व्यापार्‍याला धमकावले आणि खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. कपाडिया आणि बेग यांची गुन्हेगारी पृष्ठभूमी आहे आणि ते फरारी गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित आहेत. 45 वर्षीय व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की वेगवेगळ्या छोटा शकील लोकांकडून पैसे गोळा करून त्यांनी नवीवाला यांना त्यांच्या व्यवसायासाठी 13 कोटी रुपये दिले होते. नंतर जेव्हा जेव्हा त्यांनी नवीवालाकडे पैसे परत मागितले, तेव्हा त्याने नकार दिला. नवीवाला कपाडिया आणि मिर्झा गँगस्टर छोटा शकीलचे नाव घेऊन व्यावसायिकाला धमकावत असते.

हेही वाचा - Sanjay Raut ED Action : 'असा' राहिला संजय राऊतांचा सत्र न्यायालयातील युक्तिवाद; वाचा, प्रमुख मुद्दे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.