ETV Bharat / city

Ambani Threat Call : अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला आला कॉल - रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला धोका

मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची ( Bomb threat to Reliance Foundation Hospital ) धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर हा धमकीचा कॉल ( Threatening call to Reliance Foundation Hospital ) आला. त्यानंतर सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू ( Reliance Foundation Hospital Threat ) केला आहे.

Reliance Foundation Hospital Threat
रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
author img

By

Published : Oct 5, 2022, 3:01 PM IST

Updated : Oct 5, 2022, 5:07 PM IST

मुंबई - मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची ( Bomb threat to Reliance Foundation Hospital ) धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या लँडलाईन क्रमांकावर हा धमकीचा कॉल ( Threatening call to Reliance Foundation Hospital ) आला. त्यानंतर सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू ( Reliance Foundation Hospital Threat ) केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री 12:57 वाजता एका अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. धमक्या देणाऱ्या व्यक्तीने अंबानी कुटुंबाच्या नावानेही धमकी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीबी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दोन महिन्यांत हॉस्पिटलला धमकीचे फोन येण्याची ही दुसरी वेळ आहे, याआधी 15 ऑगस्टला 8 कॉल आले होते ज्यात हॉस्पिटलला धमकी देण्यात आली होती.

मुकेश, नीता अंबानी यांचेही नाव - याप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा कॉल अज्ञात क्रमांकावरून आला होता. फोन करणाऱ्याने अंबानी कुटुंबातील काही सदस्यांची नावे सांगून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अज्ञाताने मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अंबानी कुटुंबाची चिंता - गेल्या वर्षीपासून अंबानी कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. जेव्हा अँटिलियाजवळ 20 स्फोटक जिलेटिनच्या काठ्या, धमकीचे पत्र स्कॉर्पिओमध्ये सापडले होते. पोलिस तपासात ज्याचे नाव समोर आले, त्या वाहनाच्या मालकाने अँटिलियाच्या घटनेच्या आठ दिवसांपूर्वी वाहन चोरीचा एफआयआर दाखल केला होता. घटनेला आठवडा उलटत नाही तोच त्याचा मृतदेह मुंबईबाहेरील नाल्यात तरंगताना आढळून आला. एनआयए अँटिलिया प्रकरणाचा तपास करत आहे. अँटिलिया घटनेचा तपास आता एनआयएच्या ताब्यात आला असून, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) खून वाहन चोरीचा तपास करत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना धमकी गेल्या आठवड्यातच जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी पोलिसांनी अटक केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ही माहिती दिली. फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृह विभागाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सर्व धमक्यांची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसह अन्य बाबींवर पूर्ण लक्ष देत आहोत. काल मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 5, 2022, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.