ETV Bharat / city

राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!

या निवडणुकीत अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात असे काही तरुण चेहरे आहेत ज्यांना राजकीय वारसा लाभला असून ते आता पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवारांचा नातू रोहित पवार, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे, खासदार सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा यात समावेश आहे.

राजकीय वारसा
author img

By

Published : Oct 8, 2019, 2:15 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. आरोप प्रत्यारोपाने वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात असे काही तरुण चेहरे आहेत ज्यांना राजकीय वारसा लाभला असून ते आता पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवारांचा नातू रोहित पवार, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे, खासदार सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा - शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई

आदित्य ठाकरे -

ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरे यांनी विजय संकल्प सभेत 'हिच ती वेळ' म्हणत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. आदित्य हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ठाकरे घराण्यातील तिसरी पिढीही आता मुख्य राजकारणात उतरली आहे.

2010 मधील दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी युवासेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून आदित्य ठाकरेंनी राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. आता सध्या आदित्य हे शिवसेनेचे नेते आहेत.

रोहित पवार -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबातील चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याआधी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना तिथे पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर आता रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

कर्जत-जामखेड हा मतदारसंघ तसा भाजपचा किल्ला मानला जातो. तिथे भाजपचे मंत्री राम शिंदे हे सध्या प्रतिनिधीत्व करतात. रोहित पवार हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागील जवळपास तीन वर्षापासून रोहित हे मतदारसंघात जोडणी करत आहेत. 'बारामती अ‌ॅग्रो' च्या माध्यमातून रोहित पवार हे तरुणांच्या नेहमीच संपर्कात राहतात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातूनदेखील ते नेहमीच शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहेत. या दुष्काळी परिस्थिती रोहित पवार यांनी स्वत: शरद पवार यांच्यासोबत अनेक दौरे केले आहेत. अनेक अंगांनी परिचित असलेल्या रोहित पवार यांच्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रोहिणी खडसे -

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रोहिणी खडसे-खेवलकर या कन्या आहेत. वकील असलेल्या रोहिणी यांनी एलएलएमपर्यंत शिक्षण घेतले आहे. भविष्यात न्यायाधीश किंवा प्राध्यापक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरातील राजकीय वातावरणाने त्यांचा या क्षेत्राकडे ओढा वाढला.

घरात वडील एकनाथ खडसे हे राजकारणात असल्याने आणि राज्याचे मंत्री असल्यापासून त्यांच्यावर राजकारणाचे संस्कार झाले असल्याचे, रोहिणी सतत सांगतात. तसेच भविष्यात निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिल्यास आपल्याला नक्की आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. पण, खडसेंना थेट न डावलता त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

हेही वाचा - मुंबईत शिवसेनेचा आज दसरा मेळावा; उद्धव ठाकरे युतीबद्दल काय बोलणार?

राजकीय क्षेत्रातील कार्य

रोहिणी यांचे स्थानिक ठिकाणच्या सहकार क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी या सहाकारी संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग सहकारी महासंघाच्याही त्या पदाधिकारी राहिलेल्या आहे. एकनाथ खडसे यांचाही त्यांच्या कामावर व वैयक्तिक क्षमतांवर विश्वास आहे. त्यामळे या लढतीकडेही लक्ष लागले आहे.

अदिती तटकरे -

अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आहे. तसेच त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. अध्यक्षीय काळात अनेक विकासकामे त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहेत. अदिती या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. वडील राजकारणात असल्यामुळे अदिती यांनाही बालपणापासूनच राजकाणाचे संस्कार लाभले आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने त्यांना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधासभा मतदारसंघातून उमेदवारी भेटली आहे.

हेही वाचा - ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?

ऋतुराज पाटील -

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पुतण्या ऋतुराज पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ऋतुराज पाटील हे शिक्षणसम्राट डी. वाय पाटील यांचे नातू आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. विद्यार्थीदशेपासूनच ऋतुराज पाटील हे जनसामान्यांमध्ये जम बसवत होते. मात्र, आता ते विधानसभेच्या निमित्ताने सक्रीय राजकारणात उतरले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.