ETV Bharat / city

Robbers Arrest Mumbai: शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांना फिल्मी स्टाईलमध्ये अटक

मालाड पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा (Shopping Center Robbery Mumbai) टाकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये अटक (Thief Arrest Mumbai Malad) करण्यात आली आहे. हे दरोडेखोर अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरून शॉपिंग मॉलमध्ये दरोडा टाकण्यासाठी आले होते; मात्र दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police Station) दरोड्याची माहिती मिळताच सापळा रचून ३ आरोपींना धारदार शस्त्रांसह पकडले (Thief arrested with deadly weapon). तर ३ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर दरोडा, चोरी, प्राणघातक हल्ला आणि खंडणीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, २ चोरीचे मोबाईल फोन आणि चोरीची ऑटो रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

Robbers Arrest Mumbai
Robbers Arrest Mumbai
author img

By

Published : Sep 27, 2022, 4:44 PM IST

मुंबई : मालाड पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा (Shopping Center Robbery Mumbai) टाकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये अटक (Thief Arrest Mumbai Malad) करण्यात आली आहे. हे दरोडेखोर अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरून शॉपिंग मॉलमध्ये दरोडा टाकण्यासाठी आले होते; मात्र दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police Station) दरोड्याची माहिती मिळताच सापळा रचून ३ आरोपींना धारदार शस्त्रांसह पकडले (Thief arrested with deadly weapon). तर ३ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर दरोडा, चोरी, प्राणघातक हल्ला आणि खंडणीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, २ चोरीचे मोबाईल फोन आणि चोरीची ऑटो रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

दरोडा टाकण्यासाठी ऑटोरिक्षा चोरली - दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरी निवारा परिसरात असलेल्या अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या तिन्ही दरोडेखोरांनी मध्यरात्री अंधेरी येथून ऑटो रिक्षा चोरली होती. दिंडोशीतील नागरी निवारा परिसरात आल्यानंतर हे सर्व लोक लुटण्याच्या बेतात असताना तेथे उपस्थित काही लोकांना संशय आला. ही माहिती दिंडोशी पोलिसांना देण्यात आली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय डॉ.चंद्रकांत घार्गे यांच्यासह त्यांच्या पथकातील हवालदार नवनाथ बोराटे, श्याम रणशिवरे, शिवराम बांगर, अजित चौहान, राहुल पाटील, दत्तात्रय घार्गे यांनी तातडीने शॉपिंग सेंटरबाहेर सापळा रचला. हे चोरटे दरोडेखोर मॉलजवळ पोहोचताच लुटलेले मुद्देमाल घेऊन पोलिसांनी त्यांना घेरले. मात्र काहीजण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांचा अंधेरीपर्यंत पाठलाग केला तेथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक रिक्षा जप्त करण्यात आली असून ती लुटण्याच्या उद्देशाने अंधेरी येथून चोरण्यात आली होती.

डिसीपी सोमनाथ घार्गे दरोडेखोराला अटक केल्याप्रकरणी माहिती देताना

दरोडेखोराविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे - दिंडोशी पोलीस ठाण्याच्या तपासात असे आढळून आले की, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी, खंडणी, अंमली पदार्थाचा व्यापार, मारहाणीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अफजल अस्लम खान उर (२३) आरिफ शफी अहमद अन्सारी (२९) विघ्नेश व्यंकटेश देवेंद्र (१९) हे तिघेही बीएमसी कॉलनी, संतोष नगर गोरेगाव पूर्व मुंबई, अशी अटक आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.