मुंबई - मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख Financial Capital Mumbaiआहे. मुंबईमध्ये इंग्रजांच्या काळात बांधलेल्या अनेक ऐतिहासिक इमारती पाहण्यास पर्यटक येतात. Historical Architecture Museum याच सोबत मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय,Chhatrapati Shivaji Maharaj Museum डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, सीएसएमटी मुख्यालयातील हेरिटेज म्युझियम, बेस्टचे संग्रहालय यालाही पर्यटकांकडून भेटी दिल्या जातात. विशेष म्हणून यामधून पर्यटकांना मुंबईसह भारताचा इतिहास समजणे सोपे जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय - भारतावर इंग्रजांचे राज्य असताना मुंबईमध्ये कला आणि पुरातत्वशास्त्राचे वस्तुसंग्रहालय आणि विज्ञान तसेच निसर्गविज्ञान यांचे एकत्रित सार्वजनिक वस्तुसंग्रहालय उभारण्याच्या १९०४ मध्ये ठराव मंजूर करून, एक समिती स्थापन केली. सर फिरोजशहा मेहता, सर इब्राहिम रहिमतुल्ला आणि सर विठ्ठलदास ठाकरसी या मुंबईतील मान्यवरांचा या समितीमध्ये समावेश होता. हे वस्तुसंग्रहालय, त्याला भेट देणाऱ्यांसाठी विशेषत मुले व युवकांना स्फुर्ती देणारे साधन ठरावे असा मानस समितीतील सदस्यांचा होता. म्हणून वस्तुसंग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक असावे असा उद्देश त्यांनी बाळगला. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया १० जानेवारी १९२२ रोजी या वस्तुसंग्रहालाची दारे जनतेसाठी खुली झाली.
काय आहे या वस्तुसंग्रहालयात - पुरातत्वशास्त्रज्ञ हेन्री क्युझेन्स यांनी १९०९ मध्ये उत्खनन केलेल्या मिरपुर्खस या बुद्धधर्माशी संबधित स्थळावरील मौल्यवान कलावस्तु या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील महत्वाच्या संग्रहाचा भाग आहेत. १९१५ मध्ये शेठ पुरुषोत्तमदास मावजी यांचा पुराणवस्तू व चित्रांचा संग्रहाने याचे मोल वाढवले आहे. १९२२ आणि १९३३ मध्ये रतन टाटा यांनी केलेल्या विश्वकोषांचा संग्रह त्यांच्या यॉर्क, लंडन येथील घरामध्ये होता. तो त्यांच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार संग्रहालयाला प्रदान करण्यात आला. त्यानंतर १९३३ मध्ये दोराब टाटा यांचा संग्रहसुद्धा त्यांच्या मृत्युपत्रानुसार संग्रहालयाला देण्यात आला. संग्रहालयाच्या विस्तृत संग्रहात सुमारे 70,000 वस्तूंचा समावेश झाला आहे, ज्यात विशेषत भारतीय उपखंडातील, अगदी प्रागैतिहासिक काळापासून ते वर्तमान पर्यंतच्या मानवी कथा सांगितल्या आहेत.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय - डॉ. भाऊ दाजी लाड या संग्रहालयाची पायाभरणी 1862 मध्ये मुंबईचे गव्हर्नर सर हेंद्री बार्टल फ्रेरे यांनी केली होती. हे संग्रहालय भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आत आहे. ज्याला भायखळा प्राणी संग्रहालय किंवा राणीची बाग असे म्हणतात. भायखळा पूर्वेला असलेले हे संग्रहालय सजावटीच्या आणि औद्योगिक कलांचा खजिना म्हणून स्थापन झाले होते. या संग्रहालयात तुम्हाला मुंबईचा इतिहास पाहायला मिळेल. ज्या सात बेटांपासून मुंबई तयार झाली ती सात बेट नेमकी कशी होती ? याचा नकाशा आराखडा येथे ठेवण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे पूर्वी मुंबईत राहणाऱ्या लोकांचा पोशाख कसा होता ? त्यांचे राहणीमान कसं होतं ? याची इत्थंभूत माहिती तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळेल. इतकंच नाही तर मुंबईत ज्या राजांनी इथं राज्य केलं त्यांचे सैन्य कसं होतं ? त्यांचे पोशाख कसे होते ? याची देखील माहिती तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळते.
सीएसएमटी मुख्यालयातील हेरिटेज म्युझियम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील मुख्यालयातील तळमजल्यावर एक छोटेसे हेरिटेज म्युझियम आहे. यामध्ये रेल्वेचा इतिहास सांगणारे जुने फोटो इमारतीचा आराखडा रेल्वे छोटे इंजिनासह अन्य वस्तू आहे. १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली तेव्हा पासूनच्या १६९ वर्षांहुन अधिक काळात रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. त्यापूर्वी १८४७ मध्ये "ग्रेट इंडियन पेनिन्सुल" या रेल्वे कंपनीची स्थापना झाली होती. रेल्वे सुरू झाल्यावर कालांतराने रेल्वे गाड्या डब्बे इंजिन यात हळूहळू बदल होत गेले. १९२५ मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. ही सर्व ऐतिहासिक चित्रे या हेरिटेज म्युझियममध्ये आहेत. ब्रिटिश काळापासून असलेली कागदपत्रे रेल्वे गाड्याचे मॉडेल, जुनी छायाचित्रे येथे पाहायला मिळतात. जुन्या छायाचित्रांमध्ये पूर्वीच्याकाळी वापरण्यात आलेले टेलिफोन, संदेश वाहनाचे मोर्स यंत्र, भांडी, कंदील, अधिकाऱ्यांचे बॅच, इंजिन आणि डब्या वरील लोगो जुने तिकीट हा जुन्या काळातील खजिना जतन करून ठेवण्यात आला आहे.
बेस्टचे संग्रहालय - बेस्टच्या आणिक डेपो मध्ये वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयात घोडे ओढत असलेल्या ट्राम, इलेक्ट्रिक ट्राम, ट्रामचे तिकीट, मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या घटना, वाहतूक, विद्युत यंत्रणेत झालेली स्थित्यंतरे येथे जतन करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला अगदी जुनी बेस्ट तिकीटे पाहण्यास मिळतील. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे बस इंजिन, तिकीट तयार करण्याचं मशिन, जुन्या काळात बेस्टमध्ये लिहीले जाणारे फलक अशा अगदी जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या गोष्टी तुम्ही या संग्रहालयात पाहू शकता.
हेही वाचा : Prostitution Racket नवी मुंबईत वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश, 17 महिलांची सुटका