ETV Bharat / city

मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपात तथ्य नाही- समीर वानखेडे - समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आज गंभीर आरोप करत जेलमध्ये टाकू, असा इशारा दिला होता. मलिकांच्या टीकेला समीर वानखेडे यांनी स्वत: प्रत्युत्तर दिले आहे.

sameer wankhede
sameer wankhede
author img

By

Published : Oct 21, 2021, 8:33 PM IST

Updated : Oct 21, 2021, 10:26 PM IST

मुंबई - नवाब मलिक माननीय मंत्री आहेत, पण ते जे आरोप करत आहेत, ते खूप घाणेरडे आणि खोटे आरोप आहेत. नवाब मलिक यांनी जो आरोप केला. मी दुबईला गेलो होते, पण सर्व्हिसनंतर मी कधीच दुबईला गेलो नाही, असं समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपात तथ्य नाही
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आज गंभीर आरोप करत जेलमध्ये टाकू, असा इशारा दिला होता. मलिकांच्या टीकेला समीर वानखेडे यांनी स्वत: प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत
नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई काय करणार त्याबाबत मी तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही कायद्यानुसार योग्य निर्णय घेऊ. पण हे खूप गंभीर आहे. मंत्री नवाब मलिक मला उघडपणे जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत. मी फक्त देशाची सेवा करतोय त्यासाठी मला ते तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत, असेही समीर वानखेडे यांनी सांगितलं.

मी दुबईला कधी गेलो? वेळ तर सांगा
मी मंत्री महोदयांचं बोलणं ऐकलं आहे. त्यांनी कुठले पुरावे सादर केले आहेत? मी त्याचं बोलणं ऐकलंय. ते मला दुबईत गेल्याचं म्हणाले. त्यांनी पुरावा म्हणून माझा कुठलातरी दुबईतला फोटो पत्रकार परिषदेत सादर केलाय. मी मंत्री साहेबांना विनंती करतो की, मी कधी आणि कोणत्या वर्षी दुबईला गेलो? ते सांगा असेही वानखेडेंनी सांगितले आहे.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात दोन तासांपासून चौकशी सुरु

कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून तुरुंगात टाकणार ?
ते मालदीव जाण्याचं बोलत आहेत. मालदीव जाणं हे क्राईम आहे का? मी सरकारची अनुमती घेऊन गेलो आहे. माझ्या मुलांबरोबर मी गेलो होतो. याचा अर्थ माझ्याकडून क्राईम झाला का? मी माझ्या कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून मला तुरुंगात टाकणार? असा सवालही त्यांनी केला.

अशोक जैन यांचे स्पष्टीकरण
माझ्या बहीण आणि मृत आईवर आरोप
मी खूप सर्वसामान्य लहान शासकीय कर्मचारी आहे. मी माझी जबाबदारी करतोय. ते माझ्यावर आरोप करतात ते ठीक आहे. पण माझ्या बहिणीवर, माझ्या मृत आईवर आणि वडिलांवर ते आरोप करत आहेत. मी त्यांचा आदर करतो. पण मी त्यांच्या आरोपांचं खंडन करतो. मी माझं काम करतोय. सत्यासाठी लढतोय. पण त्यावरुन माझ्या आई-वडिलांवर आरोप केले जात आहेत असं समीर वानखेडे म्हणाले.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले ?

मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असे खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी समोर जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय ? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केला आहे.

हेही वाचा - मालदीवमधील वसूलीनंतर रिया चक्रवर्तीला अटक - मंत्री नवाब मलिक

Last Updated : Oct 21, 2021, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.