मुंबई - मुंबई महापालिकेत ( Mumbai Municipal Corporation ) भ्रष्टाचाराची गंगोत्री वाहते आहे. याला भाजपाने आक्षेप ( BJP Polkhol Abhiyan Mumbai ) घेतला. आता ही भ्रष्टाचाराची गंगोत्री साफ करण्याचा जबाबदारी भाजपाने स्वीकारली आहे अशी माहिती पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. राणीबागेत जी कंत्राटे दिली जातात त्यात भ्रष्टाचार असतो हे आज पुराव्यानिशी उघड ( BJP Corporator Ranibaug Visit ) झाले, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराची गंगोत्री - भाजपाने पोलखोल अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत आज भाजपाच्या माजी नगरसेवकांनी राणीबागेला भेट दिली. त्यानंतर प्रभाकर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, राणीबागेत प्राण्यांसाठी पिंजरे उभारले जात आहेत. यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरला आम्ही आक्षेप घेतला होता. हे टेंडर पास झाले असते तर पालिकेला आर्थिक भुर्दंड बसला असता असे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे. याचाच अर्थ राणीच्या बागेत जी कंत्राटे दिली जातात त्यात भ्रष्टाचार असतो हे आज पुराव्यानिशी उघड झाले. भाजपाने राणीबागेतील कंत्राटांवर अनेकवेळा आक्षेप घेतले होते. १८५ कोटींचे टेंडर होते, त्यात नंतर १०६ कोटींनी वाढवले. त्याचवेळी हे फुगवलेले अंदाज पत्रक आहे असा आक्षेप घेतला होता. हे अंदाजपत्रक रद्द करण्याची मागणीही आम्ही केली होती. मात्र त्या वेळेला सत्ताधारी शिवसेनेने हे कसे बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. या विरोधात विनोद मिश्रा यांनी अनेक पत्र लिहिली होती. त्याला उत्तरे देण्यात आली आहेत. त्यात कंत्राट रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. पालिकेत भ्रष्टाचाराची गंगोत्री वाहते आहे. याला भाजपाने आक्षेप घेतला. आता ही भ्रष्टाचाराची गंगोत्री साफ करण्याचा जबाबदारी भाजपाने घेतली आहे.
भाजपच्या आक्षेपानंतर कंत्राट रद्द - बच्चे कंपनी आणि पर्यटकांची आवडती राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची केली जात आहे. राणीबागेत नूतनीकरण केले जात आहे. प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात आहोत अशी जाणीव होणारे पिंजरे बांधले जात आहेत. यामधील काही कामाला भाजपाचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी आक्षेप घेतला होता. जास्त किंमत खर्च करून पिंजरे बांधले जात असल्याचा आरोप मिश्रा यांचा होता. याबाबत मिश्रा यांनी पालिकेकडे लेखी तक्रार केली होती.
पोलखोल आंदोलनाआधीच पालिकेची माघार - मिश्रा यांनी लेखी तक्रार केल्यावर आज भाजपाकडून राणीबागेत पोलखोल करण्यासाठी माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट जाणार होते. त्याआधीच पालिकेच्या ई विभाग कार्यालयाने जास्त किमतीत दिली जाणारी कामे व्यावहारिक नसल्याने रद्द केल्याचे कळविले आहे. यामुळे भाजपच्या पोलखोल आंदोलनाआधीच पालिकेने माघार घेतली आहे.