ETV Bharat / city

Sanjay Raut Attack on BJP : ...तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा - संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल - संजय राऊतांचा राज पुरोहित यांना इशारा

मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहितयांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

Sanjay Raut Attack on BJP
संजय राऊत
author img

By

Published : Jan 27, 2022, 12:04 PM IST

Updated : Jan 27, 2022, 7:11 PM IST

मुंबई - मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

Sanjay Raut Attack on BJP
संजय राऊत यांचे ट्वीट

'तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा'

टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा सणसणीत हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut Attack on BJP
संजय राऊत यांचे ट्वीट

आम्हाला भाजपकडून शिकण्याची गरज नाही -

प्रत्येक जण आज इतिहास बदलायला बसले आहे. इतिहासाचे ज्ञान त्यांनाच आहे, असे भाजपचे मत आहे. प्रत्येकजण नवा इतिहास लिहायला बसला आहे, हे इतिहासकार इतिहास बदलायला आले आहेत. आम्हाला टिपू सुलतानबद्दल माहिती आहे, भाजपकडून शिकण्याची गरज नाही असेही यावेळी संजय राऊत हे म्हटले.

संजय राऊतांचा राज पुरोहित यांना इशारा -

भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागणी केली होती. तसेच राज्यात दंगली पेटतील असा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात कोण करणार दंगली? हिंमत आहे का? जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी करून दाखवावी. इथे शिवसेनेचे ठाकरे सरकार आहे. दंगल करून दाखवाच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.

'नौटंकी करणाऱ्याला इतर गोष्टी नौटंकीच दिसणार, दृष्टी तशी सृष्टी' - प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका

नौटंकी करणाऱ्याला इतर गोष्टी नौटंकीच दिसणार, दृष्टी तशी सृष्टी असे सांगत भाजप द्वेष करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. सत्तेसाठी ज्यांच्या मांडीला मांडी लावली त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते असे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकमध्ये टिपू सुलतान यांचा कुठलाही गौरव केला नाही. तसेच शेकडो हिंदूंना टिपू सुलतानने फाशी दिली. लाखो हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने केले. हजारो मंदिरांचा विध्वंस केला. अनेक मुली-महिलांवर बलात्कार केले, या टिपू सुलतानला डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्ष लोकांनी या क्रूरक्रमाला महान योद्धा म्हणून दाखवले आहे. याला काय म्हणणार? असेही प्रवीण दरेकर म्हणाले. टिपू सुलतानला दक्षिणेचा औरंगजेब असे म्हटले जायचे. हिंदूंच्या भावनांवर प्रहार करण्याचे काम त्याने केले आहे. हिंदूंचा मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे काम सुद्धा टिपू सुलतान यांनी केले आहे आणि सत्तेसाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.

'हा' मुंबईला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न - महापौर पेडणेकर

मालाड येथील मैदानाला नाव टिपू सुलतानचे ( Tipu Sultan name Controversy ) नाव पालिकेने दिलेले नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar Statement On Tipu Sultan name Controversy ) यांनी दिली आहे. तसेच ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारात येत असून जे नाव पालिकेने दिले नाही, त्यावरून वाद कशाला, असही त्या म्हणाल्या. त्याच बरोबर हा मुंबईला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न असून पालिका आणि राज्य सरकारची विकास कामे बघून विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीकाही त्यांनी केली.

टिपू सुलतान क्रीडांगण नामकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप, बजरंग दलाची निदर्शने, अखेर झाले नामकरण

मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या नावावरून राज्य सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनी मैदानाला नाव देण्यास भाजपने विरोध केला ( Tipu Sultan stadium mumbai ) आहे. तर आज या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विरोध करताना ( Bajarang Dal workers agitations in Malad ) दिसत आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे.

टिपू सुलतान नामांतराचा प्रस्ताव महापालिकेत आलाच नाही - आदित्य ठाकरे

मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan Garden Name) यांचे नाव देण्यावरून शिवसेना व भाजप (Shivsena Vs BJP) कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांच्या विधानाने आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारचा प्रस्तावच पालिकेत आला नसल्याचे महापौरांनी याअगोदर स्पष्ट केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

'टिपू सुलतान यांच्यावरून भाजपने सुरु केलेला वाद दिशाभूल करणारा'

'टिपू सुलतान (Tipu Sultan Controversy) हे स्वतंत्र सेनानी होते. इंग्रजांशी लढा देताना ते शहीद झाले. मात्र त्यांच्या नावावरून भारतीय जनता पक्ष जो वाद उभा करतोय तो दिशाभूल करणार आहे. मलादेखील क्रीडांगणला टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शवला आहे. भारतीय जनता पक्षाने उभा केलेला हा वाद म्हणजे लोकांची दिशाभूल करणारा आहे..' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on Tipu Sultan Controversy) यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला.

हेही वाचा - Tipu Sultan Sports Complex controversy : टिपू सुलतान नावावरून भाजपची दुटप्पी भूमिका, सचिन सावंत यांची टीका

Last Updated : Jan 27, 2022, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.