मुंबई - शहरातील कांदिवली पश्चिम भागातील लालजी स्टेट लिंक रोड वरील गणेश मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुजा करण्याच्या उद्देशाने आलेल्या भाविकाने गणेश मुर्ती चोरी केली असून त्यांने मंदीरातील नारळ सुद्धा चोरी केले आहेत. ही घटना मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रविवारी सकाळी 11 ते 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. चो मदिरात देवाच्या दर्शनाच्या बहाण्याने आला होता. त्यांने मंदिरातील गणेश मुर्ती, आणि नारळ चोरी केल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस तपास करत आहेत. या प्रकारामुळे पुजारी आणि मंदिराच्या परिसरातील रहिवासी रागावले असून त्यांनी चोराला लवकरात लवकर पकडा, अशी पोलिसांकडे मागणी केली आहे.