मुंबई - राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ११ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपटगृहांसाठी विभागाने विविध नियम व मार्गदर्शक तत्वे ही प्रसिद्ध केली आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे लागू केलेले नियम आणि अटी -
- राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद राहणार आहेत.
- चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.
- चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी सभागृह, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.
- चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची दक्षता घ्यावी.
- चित्रपटगृहात येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे.
- प्रत्येकाचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक आहे.
- प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी.
- चित्रपटगृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुध्दा घेणे आवश्यक आहे.
- मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळ्या पडद्यांवर दाखवले जातात, अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेणे. ज्यामुळे प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.
- चित्रपटगृहांमध्ये काम करणारे कर्मचारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुध्दा लसीकरण करणे आवश्यक आहे.
- शॉपिगमॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठराविण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.
हेही वाचा - प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे