ETV Bharat / city

Mumbai Water supply : मुंबईला होतो 'या' धरणातून पाण्याचा पुरवठा

मुंबईकरांना वेगवेगळ्या ७ धरणातून पाणीपुरवठा ( Mumbai Water supply ) केला जातो. ही धरणे मुंबई जवळच्या ठाणे, ( Thane ) पालघर, नाशिक जिल्ह्यात ( Nashik District ) आहेत. शंभर ते दीडशे किलोमीटरवर असलेल्या या धरणांमधून मुंबईला रोज ३ हजार ८५० तर, वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

Mumbai is supplied with water from 7 different dams
मुंबईला 7 वेगवेगळ्या धरणांमधून पाणीपुरवठा होतो
author img

By

Published : Jul 21, 2022, 8:19 PM IST

मुंबई - मुंबईकरांची वर्षभराची तहान अप्पर वैतरणा, मोडक सागर, ( Modak Sagar Dam ) तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या ७ धरणांच्या माध्यमातून भागवली जाते. ही धरणे मुंबई जवळच्या ठाणे, ( Thane ) पालघर, नाशिक जिल्ह्यात आहेत. शंभर ते दीडशे किलोमीटरवर असलेल्या या धरणांमधून मुंबईला रोज ३ हजार ८५० तर वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

Mumbai is supplied with water from 7 different dams
मुंबईला 7 वेगवेगळ्या धरणांमधून पाणीपुरवठा होतो

अप्पर वैतरणा धरण - नाशिक जिल्हात इगतपुरी तालुक्यातील धडगाव या गावात वैतरणा, ( Vaitrana Dam ) अलगंडी या नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. हे धरण मातीचा भराव, दगडी बांधकाम या पासून बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची ४६.०२ मीटर तर लांबी ६हजार ७१५.७२ मीटर इतकी आहे. १९७३ साली अप्पर वैतरणा या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. धरणात पाणी साठविण्याची क्षमता ११.७१ टीएमसी म्हणजे ११ हजार ७१० दशलक्ष घनफुट इतकी आहे. अप्पर वैतरणा धरणाला ५ दरवाजे आहेत. इगतपुरी या शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर अप्पर वैतरणा हे धरण आहे. नाशिक शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. मुंबई शहरापासून १५३ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे.

मध्य वैतरणा धरण - ठाणे पालघर जिल्ह्यात मोखाडा येथे कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन २०१४ मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले. या धरणाचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) मध्य वैतरणा जलाशय असे नामकरण करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट २००९ रोजी केंद्रीय नगरविकास मंत्री डॉ. जयपाल रेड्डी यांच्या हस्ते शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे,( Uddhav Thackeray ) तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांच्या उपस्थितीत भांडूप संकुल येथे भूमिपूजन करण्यात आले होते. सुरूवातीला १२०० कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प केवळ केंद्र सरकार, पर्यावरण खाते यांच्या मंजुरीसाठी ११ वर्षे रखडला होता. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी ११ वर्षे प्रत्यक्ष कामाचा कालावधी, लोखंड, सिमेंटचे वाढलेले दर, वाहतूक खर्च, मजुरी आदी कारणांमुळे या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी रूपयांवरून १७०० कोटी रूपयांवर पोहोचला. धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जल,सौर असा संकरित ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्यास तसेच ४ रुपये ७५ पैसे प्रतियुनिट या दराने पुढील २५ वर्षासाठी वीज खरेदी करार करण्यास ८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंजूरी प्रदान केली आहे.

भातसा धरण - ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात भातसा, चोरणा नदीच्या संगमावर १९६८ मध्ये भातसा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या धरणासाठी दगडी बांधकाम करण्यात आले आहे. सुरुवातीला या धरणाचा बांधकाम खर्च १४ कोटी होता. १९८३ मध्ये हा खर्च ८० कोटींवर गेला. १९८० मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले असले तरी दरवाजांची कामे २००५ पर्यंत सुरु होते. १९९४ - ९५ मध्ये धरणाचा खर्च ३५८ कोटींवर गेला. मुंबईला या धरणामधून ५० टक्के म्हणजेच १३५ कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा - CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; यंदा गणेशोत्सव, दहीहंडी धुमधडाक्यात

तानसा धरण - ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यात तानसा गावात हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे बांधकाम दगडी असून उंची ४०.५५ मीटर तर लांबी २८३५ मीटर इतकी आहे. तानसा तलावातून मुंबईला दर दिवशी सुमारे ४५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो.

विहार धरण - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी विहार धरण हे सर्वात लहान धरण आहे. विहार धरणातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. महापालिका मुख्यालयापासून २८.९६ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. या धरणाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले. धरणाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च आला होता. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

तुळशी धरण - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त पाणीसाठा असणारे हे धरण आहे. तुळशी हे सर्वात लहान धरण असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. मुंबईपासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हे धरण आहे. या कृत्रिम धरणाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च आला होता. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन
मिळते.

धरणांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा - मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. आज ( २१ जुलै) सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १२लाख ८२ हजार २६६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ८८.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या धरणात ३३३ दिवसांचा पाणी साठा आहे. मुंबईला ११ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

२२ जुलैला पाणीसाठा
२०२२ मध्ये १२ लाख ८२ हजार २६६ दशलक्ष लिटर (८८.५९ टक्के)
२०२१ मध्ये ५ लाख ३१ हजार ७३४ दशलक्ष लिटर (३६.७४ टक्के)
२०२० मध्ये ४ चार ८ हजार ८८४ दशलक्ष लिटर (२८.२५ टक्के)

धरणातील पाणीसाठा -
अप्पर वैतरणा १ लाख ७७ हजार ९७८ दशलक्ष लिटर
मोडक सागर १ लाख २८ हजार ९२५ दशलक्ष लिटर
तानसा १ लाख ४३ हजार ७६९ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा १ लाख ८५ हजार ३८६ दशलक्ष लिटर
भातसा ६लाख १७ हजार ९२९ दशलक्ष लिटर
विहार २० हजार २३७ दशलक्ष लिटर
तुलसी ८ हजार ४६ दशलक्ष लिटर

हेही वाचा - Chandrapur Flood : गावाला बेटाचं स्वरूप, 'किराणा नाही, पिण्यासाठी पाणी नाही'; पुराच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.