ETV Bharat / city

Nihar Thackeray: बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाईल ती खरी शिवसेना; उद्धव ठाकरेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया - बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाईल ती खरी शिवसेना!

उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. ( Nihar Thackeray ) आपण राजकारणात सक्रिय होत नसून, केवळ आपल्या पक्षातील नेते मुख्यमंत्री झाले म्हणून, त्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निहार ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

author img

By

Published : Jul 29, 2022, 7:16 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. आपण राजकारणात सक्रिय होत नसून, केवळ आपल्या पक्षातील नेते मुख्यमंत्री झाले म्हणून, त्यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निहार ठाकरे यांनी सांगितले. मात्र, हे सांगत असताना निहार ठाकरे यांनी आवर्जून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जो पुढे घेऊन जात आहे, तीच खरी शिवसेना असा चिमटाही उद्धव ठाकरे यांना निहार ठाकरे यांनी काढला आहे.

राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण - आपण राजकारणात सक्रिय होत नाहीत. मात्र, आपण एक वकील आहोत. तसेच, कायदेशीर सल्ला देणार फर्म आपण चालवतो. म्हणून कायदेशीर सल्ल्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागली तर, आपण वेळोवेळी नक्कीच ती त्यांना देऊ असेही निहार ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी स्मिता ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील दोन सदस्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत - निहार ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी येऊन आपली सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांनी आपल्याला शुभेच्छा तर दिल्याच सोबत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत म्हणून त्यांनी शुभेच्छाही दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा - Murder Near Shiv Sena Branch : शिवसेना शाखेसमोर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर.. सीसीटीव्हीत थरार कैद

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.