ETV Bharat / city

Ambadas Danve : विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून अर्ज; अंबादास दानवेना संधी - एकनाथ शिंदे

Ambadas Danve : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला होता. दरम्यान, शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मराठवाड्यातील नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Ambadas Danve
Ambadas Danve
author img

By

Published : Aug 9, 2022, 8:38 AM IST

मुंबई - राज्य विधीमंडळाचे लांबलेले अधिवेशन येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्या नावाचा अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.

उपसभापतींकडे शिफारस - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन भाग पडल्याने राज्यात सत्ता पालट झाली. भाजप आणि बंडखोर शिंदे गट सत्तेत आहे. विधान परिषदेतील भाजपकडील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले. विधानपरिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संख्या प्रत्येकी १० आहे, तर शिवसेनेची संख्या १२ आहे. शिवसेनेने या पदावर दावा केला आहे. विरोधीपक्षात सर्वात जास्त संख्याबळ त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर आमदार अंबादास दानवे यांना हे पद देण्यात यावे, अशी शिफारस उपसभापतींकडे केल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्हालाच हे पद मिळेल अशी आशा व्यक्त केली.

बेकायदेशीर सरकार - बेकायदेशीर सरकारचे मंत्रिमंडळ यापेक्षा वेगळी उपमा देता येईल, असं वाटत नाही. महाराष्ट्रात विद्यमान परिस्थिती पाहता, यापूर्वी इतकी वाईट परिस्थिती माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. हे वाक्य त्यांच्या तोंडी द्यायला हवा. इतका घाणेरडा प्रकार महाराष्ट्रात यापूर्वी कधीच घडला नाही. एका बाजूला महापूर, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिलासा देणारं कोणताच पाऊल जम्बो सरकारकडून उचलले जात नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, असे सावंत म्हणाले. तसेच टीईटी प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर; आज मंत्रीमंडळ विस्तार, तर बुधवारपासून अधिवेशन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.