ETV Bharat / city

सेक्युलर म्हणणारे सर्वात अधिक धर्मांध - संजय राऊत - Kunal Kamra latest news

सेक्युलर असल्याचे जे स्वतःला म्हणतात, ते सर्वात अधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एक शिवी झाली आहे. या शब्दाचा चुकीचा वापर राजकारणात करण्यात आलाय. या शब्दामुळेच हिंदू आणि मुसलमान यांच्यात विभागणी झालीय. हिंदूंना शिव्या घालण्याने सेक्युलरिझम वाढतो हे चुकीचे आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Nov 14, 2020, 2:40 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी कुणाल कामरा आणि संजय राऊत यांचे फोटो प्रसिध्द झाले होते. त्याचवेळी संजय राऊत यांची मुलाखत कुणाल घेणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ही मुलाखत गाजणार हे नक्कीच होते. त्याप्रमाणे शट अप ए कुणाल कार्यक्रमाचा १८ वा एपिसोड प्रदर्शित झालाय आणि यात संजय राऊत बिनधास्त बोलताना पाहायला मिळाले आहेत.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच कुणाल आणि राऊत ज्या टेबलवर बसले आहेत त्या टेबलवर खेळण्यातील जेसीबी दिसत आहेत. जेसीबीशी संजय राऊत खेळताना दिसले असून हा जेसीबी कुठे जाणार आहे हे ठरलेले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ही मुलाखत खुसखुशीत होणार हे दिसत होते.

पार्टी देश चालवत नाही

हा देश कुठल्याही एका पार्टीने चालत नाही. आजवर किती तरी पार्ट्या आल्या आणि गेल्या. परंतु देश तसाच राहिला असे संजय राऊत सुरुवातीलाच एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. त्यांचा थेट निशाणा भाजपवर होता.

संजय राऊत यांच्या खासगी आयुष्याबद्दल कुणालने प्रश्न केला असता राऊत म्हणाले की पर्सनल आयुष्य असे काहीच नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केल्यानंतर राजकारणात असताना पर्सनल लाईफ काहीच असत नाही. वयाच्या २८ व्या वर्षी मला सामना दैनिकाचे संपादक बनवले. त्यानंतर माझे खासगी आयुष्य संपले. बाळासाहेबांच्या सोबत काम केलेल्या खूप कमी लोकांपैकी मी एक आहे. ३० वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

मुस्लिमांना देशात राहण्याचा पूर्ण हक्क पण...

राजकारणामध्ये असदुद्दीन ओवीसींच्या भूमिकाबद्दल राऊत मोकळेपणाने बोलले. ते म्हणाले, मुसलमान या देशाचे नागरिक आहेत. त्यांना या देशात राहण्याचा पूर्ण हक्क आहे. पण काही राजकीय पक्ष केवळ मुसलमानंच्या मतासाठी राजकारण करतात. त्याने देशाचे आणि मुसलमानांचेही नुकसान होते. त्यांना वाटतं की मुसलमान नेहमी अंधारात राहावेत. बाळासाहेबांना सांगितले होते की ज्यादिवशी हे वोट बँकेचे राजकारण संपेल त्या दिवशी देश पुढे जाईल. एका निवडणुकीत मुसलमानांचे मताचे अधिकार काढून घ्या हे स्वतःला मुसलमानांचे मसिहा समजतात ते सर्व पळून जातील.

हेही वाचा -देशभरात अशा प्रकारे साजरी होत आहे दिवाळी; पाहा एका क्लिकवर..

शपथ घटनेवर हात ठेवूनच घ्यावी

यावर कुणाल म्हणाला की, हिंदुच्या मतांवरही डोळा ठेवून राजकारण केले जाते. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, हे काही पाकिस्तान नाही. हा देश आपल्या घटनेनुसार चालेल. सर्वांना समानता मिळायला हवी. परंतु आजपर्यंत जे राजकारण झालंय त्यात एकाच धर्माला पकडण्यात आलंय, ते आहेत मुसलमान. याला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरेंनी वारंवार म्हटले होते की आपण कोर्टात जातो तेव्हा मुसलमान असेल तर कुराणवर शपथ घेईन, हिंदु असेल तर भगवतगीतेवर शपथ घेईनं हे बंद करा. भारताची जी घटना आहे त्यावर सगळ्यांनी हात ठेवून शपथ घेतली पाहिजे. ही आमची आयडॉलॉजी आहे.

शिवसेनेचा मेकओव्हर होतोय, आदित्य पर्यावरणावर भर देत आहेत, सरकार बनल्यानंतर उध्दव म्हणाले होते की धर्माचे राजकारण करुन चूक केली, असे कुणालने विचारल्यानंतर राऊत म्हणाले की असे उध्दवजी कधीच म्हणाले नव्हते. यावर कुणालने एक व्हिडिओ पुरावा दिला आहे.

हेही वाचा -देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती; अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

शिवसेना मेकओव्हर करीत आहे असे विचारले असता राऊत म्हणाले की ते काय असते? शिवसेना एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, सर्वांना बरोबर घेऊन जात आहे. किमान समान कार्यक्रमावर आम्ही चालत आहोत. घटनेच्या चौकटीत राहूनच काम करु असेही ते म्हणाले.

स्वतःला सेक्युलर म्हणणारे सर्वाधिक धर्मांध...

पण काँग्रेस, राष्ट्रवादी या सेक्युलर पक्षासोबत काम करीत आहात, असे कुणाल म्हणताच राऊत म्हणाले कोणीही सेक्युलर नाही या देशामध्ये. यावरही कुणालने राऊत सेक्युलरबद्दल बोलत असतानाचा व्हिडिओ पुरावा दिला. पुढे राऊत म्हणाले की, जे सेक्युलरिझमचे पालन करतात ते सर्वात अधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एक शिवी आहे. या शब्दाचा चुकीचा वापर राजकारणात करण्यात आलाय. या शब्दामुळेच हिंदू आणि मुसलमान यांच्यात विभागणी झालीय. हिंदूंना शिव्या घालण्याने सेक्युलरीझम वाढतो हे चुकीचे आहे. यानंतरही कुणालने राज्यपाल कोश्यारी यांनी सेक्युलर विषयावरील एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठले होते त्याचा व्हिडिओ दाखवला.

थेट मोदींनाच राऊत यांचे आव्हान

मंदिरे बंद आहेत यावर बोलताना राऊत म्हणाले की एकेदिवशी मोदींनी येऊन सांगावे की आजपासून देशातील सर्व मंदिरे उघडी करावीत, आम्ही करु. मदिरालये उघडली मात्र मंदिरे नाहीत अशाप्रकारची टिका राज्यसरकारवर होत होती. त्यावरुन भाजपाने राज्यसरकारवर टीका केली. कार्यकर्ते तसेच नेत्यांनी आंदोलनही केले. त्यावरुन राऊत यांनी थेट भाजपचे नेते आणि पंतप्रधान मोदींनाच थेट आव्हान दिले.

हेही वाचा -प्रदूषणाची पातळी वाढली; पूर्व दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर

कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामाचे राऊत यांनी कौतुक केले. रिजनल पार्टींचे महत्व, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, नोटबंदीला विरोध, राजकारण हा साधूसंतांचा खेळ नाही, आम्ही इथे तपस्या करण्यासाठी आलेलो नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, राजकारण करायचे नाही. पण नंतर लक्षात आले की आपल्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर सत्तेत गेले पाहिजे. आम्ही अनेक पक्षांसोबत युती केली आहे, अगदी समाजवाद्यांसोबतही काम केलंय. इंदिरा गांधींनी जेव्हा आणिबाणी लागू केली होती तेव्हा शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी देशात ज्याप्रकारचे वातावरण बनले होते, शिस्त नव्हती, काही लोक तर देश जाळण्याची भाषा करीत होते, यामुळे देश तुटेल म्हणून बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. तेव्हा आमचा पक्ष खूपच छोटा होता. आतासुध्दा जेव्हा उध्दवजींनी भाजपची साथ सोडली त्याचेही काहीतरी कारण होते. आमची भाजपसोबत २५ वर्षांची युती होती. आमची त्याच्यासोबत इमोशनल, आयडॉलॉजीकल नाते होते.

सुशांत मुंबईकरच...

यानंतर सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा कुणालने राऊत यांच्याशी केली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की सुशांत हा बिहारचा पुत्र होता. त्यावर राऊत म्हणाले की त्याला जी ओळख मिळाली ती मुंबईमुळे मिळाली. मी तर सुशांतला बिहारचा मानतच नाही तो मुंबईचा होता. सुशांतच्या बाबतीतील सत्य लपवून ते काही तरी शोधत आहेत. मुंबई पोलिसांनी जो तपास केला होता तो शंभर टक्के खरा होता. मुंबई पोलीस ही देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस आहे. त्यांना माफिया म्हणणे, शिव्या घालणे थांबवले पाहिजे. मुंबईच नव्हे तर देशातील कुठल्याही शहराच्या पोलिसांशी असे वागणे योग्य नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.