मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून आलेली कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात ( control of corona wave in Mumbai ) आली आहे. गेले काही दिवस १००हून कमी ( corona cases in Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षातील सर्वात कमी रुग्णांची ही ( lowest corona cases in Mumbai ) नोंद आहे. आज ४४ रुग्ण आढळून आले आहेत. तर सुदैवाने एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
मुंबईत ४४ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत आज (१६ मार्च) ४४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली ( Zero corona deaths in Mumbai ) आहे. आज ५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ३८४ रुग्णांची नोंद ( total corona cases in Mumbai ) झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ४९३ रुग्ण बरे झाले ( corona patients discharged in Mumbai ) आहेत. तर १६ हजार ६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५३५५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे.
९९.७ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ४४ रुग्णांपैकी ३७ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये २८,३८७ बेड्स आहेत. त्यापैकी ९० बेडवर म्हणजेच ०.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.७ टक्के बेड रिक्त आहेत.
हेही वाचा-Dialogue With Lalrin Puiya : जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करेल - लालरिन पुईया
असे झाले रुग्ण कमी -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. त्यावेळी ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४ रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा-Manisha Kayande On Pravin Darekar : प्रवीण दरेकर फरार आहेत का?, शिवसेनेने विधानपरिषदेत भाजपाला डिवचले
३२ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण ३२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात १४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत १ सक्रिय रुग्ण -
धारावीत आज एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. धारावीत आजपर्यंत एकूण ८६५१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८२३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या १ सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.