ETV Bharat / city

'मुख्यमंत्र्यांनी राज्यात अप्रत्यक्षपणे लॉकडाऊनच जाहीर केला आहे'

महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंतत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला ठोस काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा असतांना फुटकळ आश्वासनांपलीकडे फारसे काही पदरी पडले नाही. मदतीच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं आहे, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आमदार अतुल भातखळकर
आमदार अतुल भातखळकर
author img

By

Published : Apr 14, 2021, 12:57 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी ठाकरे यांनी लॉकडाऊन या शब्दाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता महाराष्ट्रात अप्रत्यक्षपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

फक्त केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी केला - आमदार भातखाळकर

"महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंतत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला ठोस काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा असतांना फुटकळ आश्वासनांपलीकडे फारसे काही पदरी पडले नाही. एकीकडे महाराष्ट्रातील सुविधा अपुऱ्या आहेत, अशी नेहमीची तक्रार करत पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्यांच्या यादीवरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. एकूणच आतापर्यंतच्या फेसबुक लाइव्हमध्ये केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रमच मुख्यमंत्र्यांनी केल्याचे दिसले. आपल्याकडे तूर्तास कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असाच या भाषणाचा सूर होता. संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होईल, अशी शक्यता होती, पण तशी स्पष्ट घोषणा न करता मागच्या दाराने लॉकडाऊन करण्याची पळवाट शोधण्यात आली". अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

अतुल भातखळकर यांचं ट्विट
"मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण म्हणजे सर्वांना गोंधळात टाकणारे आहे. मागल्या दाराने आणलेला हा लॉकडाऊन आहे. पोपट मेलाय असे थेट न म्हणता, पोपट बोलत नाहीये, पोपट खात नाहीये, पोपट हालचाल करत नाहीये एवढेच म्हणणे त्यांनी बाकी ठेवले आहे. अशी टीका भातखळकरांनी केली आहे. केंद्र सरकारकडे मुख्यमंत्र्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या आधीच केल्या असत्या तर पूर्ण झाल्या असत्या. पण केंद्राची सगळी मदत मिळत असताना केंद्राच्या नावाने बोंबाबोंब केल्यानंतर पुन्हा कोणत्या तोंडाने मदत मागायची, ही अडचण असल्यामुळे त्यांनी लोकसांसमोर उद्या पत्र लिहीन वगैरे सांगितले". असे अतुल भातखळकर यांनी ट्विट केल आहे.

हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.