ETV Bharat / city

प्रवाशांना दिलासा : सीएसएमटीपासून साडेनऊ तासानंतर सुटली पहिली लोकल

मुंबई, ठाणे व नवी मुंबई या शहरांना पहिलाच पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रेल्वे स्टेशनमध्ये पाणी भरल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा सकळी बंद केली होती.

मुंबई लोकल
मुंबई लोकल
author img

By

Published : Jun 9, 2021, 10:09 PM IST

मुंबई- पावसामुळे ठप्प झालेली लोकल सेवा तब्बल साडेनऊ तासांनी पुन्हा सुरू झाली आहे. सीएसएमटीवरून सायंकाळी 7 वाजून 45 मिनीटांनी पहिली लोकल सुटली. तर, त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरून धिम्या गतीने सीएसएमटी-कल्याण, कसारा, कर्जत लोकल सेवा सुरू झाली. हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगाव सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ठाणे व नवी मुंबई या शहरांना पहिलाच पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रेल्वे स्टेशनमध्ये पाणी भरल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा सकळी बंद केली होती. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना अनेक गाड्या पावसामुळे रद्द कराव्या लागल्या. तर काही गाड्या या मुंबईबाहेरच थांबवण्यात आल्या आहेत. तर रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या बसेस अन्य मार्गाने वळवण्यात आल्या.

साडेनऊ तासानंतर सुटली पहिली लोकल

हेही वाचा-Mumbai Rains पहिल्याच पावसात मुंबईचे झाले जलाशय, सायन, हिंदमाता, किंग सर्कल, मिलन सबवेत पाणी साचले

पावसामुळे लोकल बंद

मध्य रेल्वे वर सायन, चुनाभट्टी, कुर्ला येते पाणी भरल्याने वाहतुक थांबविण्यात आली. मध्य रेल्वेने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी दरम्यनची लोकल सेवा बंद केली होती. प्रवाशांच्या सोयी करिता ठाणे-कर्जत, ठाणे - खोपोली आणि ठाणे -कसारा दरम्यान लोकल सेवा चालविण्यात आलेल्या आहेत. तर हार्बर मार्गांवर सकाळी सीएसएमटी ते वाशी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेने मानखुर्द ते पनवेल आणि मानखुर्द ते वाशीसाठी विशेष गाड्या चालविण्यात आलेल्या होत्या.

हेही वाचा-अहो आश्चर्यम!... महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, गिनिज बुकात नोंद होण्याची शक्यता

साडे नऊ तासानंतर सुटली पहिली लोकल-

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर धीम्या मार्गावरील सीएसएमटीवरून सायंकाळी 7 वाजून 45 मिनीटांनची पहिली लोकल सोडण्यात आली आहे. तर, त्यानंतर सायंकाळी 7.45 ची ठाणे लोकल सुटली. मध्य रेल्वे मार्गावरून धिम्या गतीने सीएसएमटी-कल्याण, कसारा, कर्जत लोकल सेवा सुरू झाली. हार्बर मार्गावरून सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगाव सेवा सुरू झाली. मानखुर्द-पनवेल शटल सेवा सुरू करण्यात आली. मात्र, वडाळा-मानखुर्द दरम्यान पावसाचे पाणी साचल्याने या मार्ग बंद रात्री ८ वाजेपर्यंत बंदच होता.

बेस्टचे अनेक बस मार्ग वळवले-

बुधवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे बेस्ट मार्गावर अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईत सायन रोड क्रमांक २४ येथे पाणी साचल्याने बस क्रमांक ७ मर्या, १० मर्या हे मार्ग मुख्य रस्त्याने वळवण्यात आले. हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस क्रमांक १, ४ मर्या ,५ ,६ मर्या ,७ मर्या , ,८ ,११ मर्या , १५ , १९ मर्या , २१ मर्या , ४० मर्या व ३६८ मर्या हे मार्ग हिंदमाता पुलावरून वळवण्यात आले आहे. लोकलची वाहतुक ठप्प झाल्यानंतर मुंबईकरांना बेस्टच्या बसेसची साथ मिळाली.परंतु अनेक सखल भागात पाणी पाणीभरल्याने बेस्टच्या बसेस देखील पाण्यात अडकल्या. त्यामुळे बेस्टची वाहतुकदेखील दिवसभर बेस्टचा बसेस काहीशी विस्कळित झाली. दिवसभरात सुमारे ६० बसस पाण्यात अडकल्या होत्या. त्या सर्व बस पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत.

प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले-

सकाळी जोरदार पडलेल्या पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी रेल्वे रुळावर धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले होते. परिणामी, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी लोकलमधून पाण्यात उडू घेऊन सुरळीत ठिकाण गाठले. मात्र, दिव्यांग व गरोदर महिलांना लोकलमधून उतरणे कठिण होऊन बसले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचून प्रवाशांना बाहेर काढले जात होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.