ETV Bharat / city

दोन दिवसांत बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर होणार - evaluation proposal Chief Minister Thackeray

शालेय शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे, येत्या दोन दिवसांत बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Evaluation Policy Varsha Gaikwad
मुल्यमापन धोरण वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jun 23, 2021, 10:33 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा निकालासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे, येत्या दोन दिवसांत बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा - सत्तेच्या गुळाच्या ढेपाला चिपकलेले मुंगळे आहेत हे - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सुपूर्द

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्याकंन करतांना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या बारावीच्या मुल्यांकनाच्या धर्तीवर, तसेच राज्याने इयत्ता दहावीसाठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मुल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या परीक्षांच्या मुल्यमापनाचा धोरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बारावीचा परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

सीबीएसईच्या धर्तीवर होणार मूल्यांकन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. तसेच, सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांची मुल्यांकन पद्धतीही जाहीर झाली आहे. ज्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे. यात दहावीच्या परीक्षेचे ३० टक्के गुण, अकरावीमधील ३० टक्के गुण आणि बारावीतील ४० टक्के गुणांचा समावेश असणार आहे. सीबीएसईच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, राज्यातील बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे.

कोरोनामुक्त गावांत शाळेची घंटा वाजणार

काल झालेल्या बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांमधील दहावी, तसेच बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत, त्या गावांत दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत.

हेही वाचा - नवी मुंबईत रुळावर बसलेल्या म्हशींना रेल्वेने उडवले; ११ म्हशींचा मृत्यू, ३ जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.