ETV Bharat / city

Marathi Nameplate on School : मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत, पालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय - मुंबई महापालिका

मुंबईतील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत ( Nameplate in Marathi ) कराव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता मुंबईमधील सर्व शाळांचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

BMC
BMC
author img

By

Published : Apr 5, 2022, 8:23 PM IST

मुंबई - मुंबईतील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्यात, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता मुंबईमधील सर्व शाळांचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू असणार आहे.

शाळांवर मराठी नामफलक - युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील शाळांचे नामफलक मराठीत असावे, अशी मागणी युवासेनेने मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 5 एप्रिल) महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये योग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे आदेश दिले आहेत.

सर्व शाळांना निर्णय बंधनकारक - मुंबईत अनुदानित 394, विनाअनुदानित 678 आणि अन्य खासगी बोर्डाच्या 219 शाळांना आहेत. मुंबई महापालिकेकडून हा निर्णय मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांसाठी घेण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुंबईतील सर्व शाळांना आपल्या मान्यता क्रमांकासह 8 बाय 3 फुटाचे नाम फलक मराठीमध्ये लावावे लागणार आहेत.

हेही वाचा - Jayant Patil on ED : आघाडीच्या नेत्यांबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.