ETV Bharat / city

रुग्णांना बोगस लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टरला दणका ; देशात पहिल्यांदाच निलंबन - pathologist doctor suspended in mumbai

राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचा आणि बोगस पॅथॉलॉजी डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. तर या बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवणारे लोक रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत, त्यांची आर्थिक लूटही करत आहे. महत्वाचे म्हणजे यात त्यांना अन्य डॉक्टरांची साथ मिळत आहे. असे असताना आता महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने बोगस पॅथॉलॉजी प्रकरणी एका फिजिशिअन डॉक्टरला दणका दिला आहे.

बोगस पॅथॉलॉजी लॅब बातम्या
रुग्णांना बोगस लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या; देशात पहिल्यांदाच डॉक्टरचे निलंबन
author img

By

Published : Dec 7, 2020, 4:23 PM IST

Updated : Dec 7, 2020, 7:59 PM IST

मुंबई - राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचा आणि बोगस पॅथॉलॉजी डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. तर या बोगस पॅथॉलॉजी लॅब चालवणारे लोक रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत, त्यांची आर्थिक लूटही करत आहे. महत्वाचे म्हणजे यात त्यांना डॉक्टरांची ही साथ मिळत आहे. असे असताना आता महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने बोगस पॅथॉलॉजी प्रकरणी एका फिजिशिअन डॉक्टरला दणका दिला आहे. बोगस पॅथॉलॉजीतून रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या करून घेणाऱ्या खामगाव, बुलढाणा येथील एका फिजिशियन डॉक्टरला दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदाच मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टरविरोधात अशी कारवाई झाली असून यामुळे आता बेकायदेशीर कामे करणाऱ्या डॉक्टरांना चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बोगस पॅथॉलॉजी लॅब बातम्या
राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅबचा आणि बोगस पॅथॉलॉजी डॉक्टरांचा सुळसुळाट आहे.

काय आहे प्रकरण?

बुलढाणा, खामगाव येथील एक डॉक्टर आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी एका लॅबमध्ये पाठवत होता. तर या चाचण्यांच्या अहवालानुसार तो उपचार देखील करत होता. मुळात हा डॉक्टर ज्या लॅब मध्ये रुग्णांना पाठवत होता ती बोगस होती. कारण यामध्ये नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर नाही. तर डीएमएलटी केलेल्या व्यक्तीकडून अर्थात तंत्रज्ञाकडून ही लॅब चालवली जात होती. तसेच वैद्यकीय चाचणी अहवालावर हा तंत्रज्ञ सह्या करत होता. या अहवालानुसार तो डॉक्टर उपचार करत होता. एकूणच बोगस लॅबमध्ये रुग्णांना पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करत रुग्णांच्या जीवाशी खेळ करत होता.

अखेर वर्षभरापूर्वी या डॉक्टरविरोधात तक्रार दाखल

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पॅथॉलॉजी लॅब या एमएमसी नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टकडूनच चालवणे बंधनकारक आहे. तर सर्व चाचण्या त्याच्या उपस्थितीत करत अहवालावर त्याची सही असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला हरताळ फासत बोगस लॅबचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. तर यात बोगस लॅब चालवणाऱ्यांना अन्य डॉक्टरांची साथ मिळत आहे. स्वार्थापोटी, कमिशन मिळवण्यासाठी डॉक्टर या बेकायदेशीर गोष्टी करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशीच तक्रार खामगाव, बुलडाणा येथील एका फिजिशियनविरोधात वर्षभरापूर्वी एमएमसीकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान अशोक बाविस्कर असे या डॉक्टरचे नाव असून त्यांचे खामगाव येथे अक्षय नावाचे हॉस्पिटल आहे.

दोन महिन्यांसाठी निलंबन

डॉ.बाविस्कर मागील अनेक वर्षे बोगस पॅथॉलॉजीमध्ये पाठवत असून तंत्रज्ञाची सही असलेल्या अहवालानुसार उपचार करत होते. एकूणच ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत रुग्णांच्या जीवाशी खेळत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी डॉ.गोपाल सोनी, अध्यक्ष पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन, बुलडाणा यांनी केली होती. यावरील अंतिम सुनावणी नुकतीच पार पडली असून यात डॉ.बाविस्कर दोषी आढळल्याची माहिती डॉ.सोनी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. तर या सुनावणीनुसार डॉ.बाविस्करला दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरला निलंबित करण्याची पहिलीच घटना

बोगस लॅब, बोगस पॅथॉलॉजिस्ट आणि त्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरांविरोधात शेकडो तक्रारी आहेत. पण याप्रकरणी कारवाई होत नसल्याने यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने यांचे फावते. पण आता मात्र नियम मोडत रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरलाच एमएमसीने दणका दिला आहे. डॉ.बाविस्करचे दोन महिन्यांसाठी निलंबन केले आहे. आता दोन महिने या डॉक्टरला प्रॅक्टिस करता येणार नसून हा निर्णय ऐतिहासिक असल्याची माहिती डॉ प्रसाद कुलकर्णी, पदाधिकारी, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट यांनी सांगितले आहे. तर देशात पहिल्यांदाच बोगस लॅबप्रकरणी एका मेडिकल प्रॅक्टिशनरला शिक्षा होत आहे. त्यामुळे आता अशा डॉक्टरांना आणि बोगस लॅब चालवणाऱ्याना दणका बसेल, अशा विश्वास डॉ.कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. तर यापुढे देखील अशी प्रकरणे उजेडात आणत त्या विरोधात एमएमसीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे डॉ. गोपाल सोनी यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 7, 2020, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.