ETV Bharat / city

भ्रष्टाचार, चौकशीच्या फायली सुरक्षित राहण्यासाठी पालिका करणार अडीच कोटी खर्च - पालिका अधिकारी

मुंबई महापालिकेत अधिकारी आणि कंत्राटदारांच्या साटेलोट्यातुनअनेक भ्रष्टाचाराचे प्रकार उघड झाले आहेत. भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या फाईली, अहवाल खराब होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेने या फायली आणि अहवाल सुरक्षित ठेवता यावेत, यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार आहे.

पालिका
पालिका
author img

By

Published : Jul 9, 2021, 10:56 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेत अधिकारी आणि कंत्राटदारांच्या साटेलोट्यातुनअनेक भ्रष्टाचाराचे प्रकार उघड झाले आहेत. भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या फाईली, अहवाल खराब होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेने या फायली आणि अहवाल सुरक्षित ठेवता यावेत, यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार आहे.

फायली झाल्या खराब -

मुंबई महापालिकेत आतापर्यंत नालेसफाई, रस्ते, शैक्षणिक, भूखंड खरेदी, ग्रीस, रुग्णालयीन उपकरणे खरेदी आदी प्रकरणांत भ्रष्टाचार, घोटाळे झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीच्या फाईली, कागदपत्रे आदी सुरक्षितपणे जतन करणे महत्वाचे आहे. मात्र पालिकेकडे तशी स्वतंत्र्य व्यवस्था नसल्याचे समजते. त्यामुळेच या गंभीर प्रकरणाच्या फाईली रॅक, कपाटे यांची क्षमता पुरेशी नसल्याने पालिका कार्यालयात उघड्यावर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील वातावरणामुळे या फाईली खराब होत आहेत, अशी जाहीर व धक्कादायक कबुली पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता यांनी दिली आहे.

फायली राहणार सुरक्षित -

आतापर्यंत भ्रष्टाचार, घोटाळे, गैरव्यवहार प्रकरणांत चौकशी होऊन तयार केलेले किती अहवाल व कागदपत्रे खराब झाली, वाया गेली याबाबतची माहिती देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला होता. मात्र आता यावर उपाययोजना म्हणून पालिका प्रशासनाने, गंभीर प्रकरणातील चौकशी अहवाल, कागदपत्रे, फाईल्स व्यवस्थित व योग्य पद्धतीने जतन आणि सुरक्षित ठेवण्यासाठी बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंट उपलब्ध करण्याचा व त्याचा वापर करण्याचा निर्णय उशिराने का होईना घेतला आहे. त्यामुळे अहवाल, फाईल्स, कागदपत्रे ठेवणे, हाताळणे सोयीस्कर होणार आहे. परिणामी कार्यालयीन कामकाजातही सुसूत्रता येणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यासाठी पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी करण्यात आला.

यासाठी घेतला निर्णय -

या प्रस्तावात, मुंबई महापालिकेतील २४ विभाग कार्यालये, रुग्णालये, नगर अभियंता खाते आणि इतर महत्वाच्या कार्यालयात घडत असलेल्या अनियमितता, गैरवर्तवणूकीची आणि गैरव्यवहाराची चौकशी प्रकरणे परिमंडळीय कार्यालयाकडून पूर्ण झाल्यावर त्याबाबतच्या अंतिम कार्यवाहीकरिता सर्वच प्रकारच्या खात्याअंतर्गत चौकशी विभागाकडे वर्ग करण्यात येतात. या फायली खराब किंवा गहाळ झाल्यास दोषी अधिकाऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. यासाठी पालिकेने या फायली सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत फायली कुठे होत्या -

पालिकेत चौकशी सुरू असलेल्या फायली खराब होत असल्याने बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. हा प्रस्ताव पाहिल्यावर आतापर्यंत फायली कुठे ठेवल्या जात होत्या, त्या सुरक्षित होत्या का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता हा प्रस्ताव मंजूर केल्याने या फायली आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवली पाहिजेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे. तर प्रशासनाने नवीन कल्पना मांडली आहे. त्याचे स्वागत करायला पाहिजे. या द्वारे कागदपत्रे सुरक्षित राहतील म्हणून प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.