मुंबई - पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणात ( Metro Dairy Case West Bengal ) ईडी आणि सीबीआयने धाडी टाकून ( ED CBI Raid ) चौकशी केलेल्या कंपनीकडून भाजप नेते किरीट सोमय्यांच्या संस्थेला ( Yuvak Pratishthan ) देणगी देण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आप क्रोनॉलॉजी समझिये, हिसाब तो देना पडेगा, म्हणत राऊतांनी ट्विट केले ( Sanjay Raut Allegation On Kirit Somaiya ) आहे.
किरीट का कमाल भाग २ : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजप नेते किरीट सोमय्यांवर सातत्याने आरोपांची सरबत्ती करत असतात. काल संजय राऊत यांनी किरीट का कमाल असे ट्विट करत, सोमय्यांनी ज्या कंपन्यावर आरोप केले होते, त्यांच्याकडून स्वतःच्या संस्थेकरिता दोन वर्षांनी देणग्या घेतल्या. ही क्रोनोलॉजी समजीए असं सांगत केंद्रीय तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त संकल्प असलेला सोमय्यांचा फोटो ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यातच आज सोमय्या यांनी किरीट कमाल २ जाहीर करत सोमय्यांना अडचणीत आणले आहे.
-
Kirit ka Kamal : 2
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- Metro dairy case in West Bengal is being probed by @dir_ed & #CBI
- The Same Metro dairy donated lacs of rupees to Kirit Somaiya's Yuvak Pratishthan.
"Aap Chronology samjhiye !"
Hisaab toh Dena padega Bhai! @sanjayp_1 pic.twitter.com/pzks6uvLpm
">Kirit ka Kamal : 2
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2022
- Metro dairy case in West Bengal is being probed by @dir_ed & #CBI
- The Same Metro dairy donated lacs of rupees to Kirit Somaiya's Yuvak Pratishthan.
"Aap Chronology samjhiye !"
Hisaab toh Dena padega Bhai! @sanjayp_1 pic.twitter.com/pzks6uvLpmKirit ka Kamal : 2
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2022
- Metro dairy case in West Bengal is being probed by @dir_ed & #CBI
- The Same Metro dairy donated lacs of rupees to Kirit Somaiya's Yuvak Pratishthan.
"Aap Chronology samjhiye !"
Hisaab toh Dena padega Bhai! @sanjayp_1 pic.twitter.com/pzks6uvLpm
काय आहेत आरोप : सन 2013 14 मध्ये किरीट सोमय्यांनी एका कंपनी विरोधात आरोप केले होते. संबंधित कंपनीच्या प्रमुखाची ईडीकडून चौकशी झाली. पुढे 2017-18 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. ही क्रोनोलॉजी समजीए, अस सांगत राऊत यांनी सर्व प्रकरणी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरुवातीला 'किरीट का कमाल २' असे ट्विट केले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधीचा निधी कसा मिळला. की काळा पैसा पांढरा करायचा घाणेरडा डाव आहे, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. या सर्वांचा हिशोब द्यावाच लागेल. या प्रकरणी धर्मादाय आयुक्त, तपास यंत्रणाकडे तक्रार केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राऊत आणि सोमय्या असा वाद पुन्हा रंगणार आहे. त्यातच आता आरोपांचा दुसरा भाग ट्विट केल्याने सोमय्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा : Sanjay Raut On Kirit Somaiya : 'उगाच फडफडू नका सगळी पीस गळून पडतील'; संजय राऊत यांची सोमैयांवर टीका