ETV Bharat / city

CM Eknath Shinde Depart Tonight : द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री लावणार हजेरी; आज रात्री विशेष विमानाने रवाना

author img

By

Published : Jul 24, 2022, 12:19 PM IST

देशाच्या राजकारणात सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक 18 जुलैला पार पडली. त्याच पार्श्वभूमीवर उद्या राष्ट्रपदी पदाचा शपथविधी ( ( Draupadi Murmu will take oath of President )उद्या होणार असल्याने देशभरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात ( Dignitaries of All Over Country ) आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना आमंत्रित ( CM Eknath Shinde has Also been Invited ) करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे या सोहळ्याला हजेरी लावणार असून, आज रात्री विशेष विमानाने ते दिल्लीला जाणार आहेत.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : देशाचे नवीन राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार ( Draupadi Murmu will take oath of President ) आहेत. यासाठी देशभरातील मान्यवरांना आमंत्रित ( Dignitaries of All Over Country ) करण्यात आले आहे. तसेच, राज्यातील मुख्यमंत्र्यांनादेखील या शपथविधीसाठी आमंत्रित ( CM Eknath Shinde has Also been Invited ) करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हेदेखील या सोहळ्याला हजेरी लावणार असून, आज रात्री विशेष विमानाने ते दिल्लीला जाणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शपथविधीसाठी आमंत्रण : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलैला झाली. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रोपदी मुर्मू यांना नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने समर्थन दिले होते. तसेच, शिवसेनेकडूनही त्यांना समर्थन देण्यात आले होते. उद्या त्यांचा शपथविधी होणार असून, या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा दिल्ली दौऱ्यावर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावली असून, या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्ली दौऱ्यावर असल्याने शपथविधी पार पडल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्तार मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांची टीका : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. तरी अजून कॅबिनेट मंत्रिमंडळाची स्थापना नाही. कोणत्याही मंत्र्यांचे शपथविधी झालेला नाही. 23 दिवस उलटून गेले तरी, अद्यापि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने, विरोधक सातत्याने नवीन सरकारवर टीका करीत आहेत. मात्र, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, याबाबत सत्ताधारी पक्षाकडून शाश्वत करण्यात येत आहे.

हेही वाचा : First Lady Sarpanch of Shinde Group : शिंदे गटाची राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीवर सत्ता, 'या' ग्रामपंचायतीवर फडकविला झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.