ETV Bharat / city

फ्रान्सविरोधातील उद्रेकावर महाविकास आघाडीतील पक्षांची सावध भूमिका - महाविकास आघाडी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या काही दिवस अगोदर फ्रान्समध्ये त्यांच्या कार्टूनवरून उद्भवलेल्या वादाचे देशभरात पडसाद उमटले. यावर सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.

Outbursts against France
फ्रान्सविरोधात उद्रेक
author img

By

Published : Nov 1, 2020, 9:22 AM IST

Updated : Nov 1, 2020, 11:15 AM IST

मुंबई - इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये त्यांच्या कार्टूनवरून वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. मुंबईत दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. तथापि, यावर सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेने सावध भूमिका घेतली आहे.

फ्रान्सविरोधात उद्रेक

मुंबईत सर्वच आंदोलने शांततेत झाली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस सलीम मजबूल पठाण यांनी सांगितले की, आमच्या धर्मगुरूंचा जो अवमान करण्यात आला, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते. विशेष म्हणजे, मोहम्मद पैंगबर यांच्या जयंतीनिमित्ताने सलोखा आणि शांतता राखली जावी, म्हणून आमच्या मौलवींनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत मुंबईत सर्वच आंदोलने शांततेत झाली, असा दावा पठाण यांनी केला.

फ्रान्समध्ये घडलेला प्रकार निषेधार्ह

तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते व माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले, फ्रान्समध्ये जो प्रकार घडला तो निषेधार्ह होता. मुंबईत फ्रान्सच्या राष्ट्रपतीचे जे चित्र रस्त्यांवर लावून ते पायदळी तुडवले, ते देखील चुकीचे होते. तसेच अशा प्रकारचे कृत्य निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेची सावध भूमिका

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने यावर भूमिका जाहीर केलेली नाही. तर, भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी राज्य सरकारवर टीका केली. भारत फ्रान्ससोबत उभी असताना मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्रपतीचा अपमान केला जातो, हे आपल्या राज्यात काय सुरू आहे, असा सवाल केला. तर भाजपाचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुस्लीम समुदायांकडून करण्यात आलेल्या या आंदोलनावर जोरदार टीका केली होती.

शुक्रवारी काढण्यात येणाऱ्या जुलूसवर मर्यादा

मुंबईतील मोहम्मद अली रोड, दोन टाकी, नागपाडा, आदी भागात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचे फोटो रस्त्यावर लावून ते पायदळी तुडविण्यात आले आणि विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. याची दखल घेत मुंबई पोलिसांनी भायखळा, मशीद बंदर, नागपाडा, मोहम्मद अली रोड आदी परिसरात कलम १४४ लागू केले होते. तसेच शुक्रवारी मोहमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या जुलूसवरही मर्यादा घालण्यात आल्या होत्या.

हेही वाचा- वाचा एका क्लिकवर : काय होणार आज दिवसभरात...

हेही वाचा- जाणून घ्या देशभरातील कोरोनाची परिस्थिती...

वादग्रस्त व्यंगचित्र

फ्रान्समधील पॅरिस शहराच्या उत्तर भागातील एका शाळेत भूगोल विषयाच्या शिक्षकाने वर्गात शिकवताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्या शिक्षकाचा शिरच्छेद केला. पोलिसांच्या कारवाईत या हल्लेखोराचाही मृत्यू झाला होता. सुमारे १५ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या घटनेचे पडसाद मुंबईतही उमटले.

Last Updated : Nov 1, 2020, 11:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.