ETV Bharat / city

लोकल ट्रेनमध्ये बाप्पा विराजमान, राहुल वाडिया यांची कला

author img

By

Published : Sep 17, 2021, 10:31 AM IST

गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. मुंबईत ज्याप्रकारे मोठमोठे देखावे सार्वजनिक मंडळांकडून साकारले जातात ते यावेळेस साकारले गेले नाहीत. मात्र, घरगुती गणपतीने ही कसर भरून काढली आहे. घाटकोपर येथील राहुल वडिया यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलचा आकर्षक देखावा तयार केला आहे.

लोकल ट्रेनमध्ये बाप्पा विराजमान
लोकल ट्रेनमध्ये बाप्पा विराजमान

मुंबई - मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. मुंबईत ज्याप्रकारे मोठमोठे देखावे सार्वजनिक मंडळांकडून साकारले जातात ते यावेळेस साकारले गेले नाहीत. मात्र, घरगुती गणपतीने ही कसर भरून काढली आहे. घाटकोपर येथील राहुल वडिया यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलचा आकर्षक देखावा तयार केला आहे.

लोकल ट्रेनमध्ये बाप्पा विराजमान
घाटकोपरच्या गंगावाडी मध्ये रहाणाऱ्या राहुल वडिया या कलाकाराने आपल्या घरातील गणपती बाप्पा हा चक्क मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये विराजमान केला आहे. वडिया कुटुंब गेले ९ वर्ष घाटकोपर मधील गंगावाडी येथील गोपाळ भवन मधील घरात गणपती बसवत आहेत. मात्र, त्यांच्या घरातील गणपती आणि आरास ही विशिष्ट असते. कारण त्यांची पर्यावरण पूरक गणेश मूर्ती आणि आरास हे स्वतः अपलाईड आर्टचे विध्यार्थी असलेले राहुल वडिया हेच करत असतात.

गेले महिनाभर आधी स्केच बनवले

यंदा त्यांनी सुमारे ४ फूट लांब आणि २ फूट उंच मुंबईच्या लोकलचा घाटकोपर रेल्वे स्थानकात उभा डब्बा बनवला आहे. यामध्ये घाटकोपर रेल्वे स्थानक आणि लोकलच्या डब्यात १ फुटाची गणपतीची जी शाडूच्या मातीची मूर्ती विराजमान आहे. कागद, सनबोर्ड आणि कागदी स्ट्रॉच्या सहाय्याने मिनियेचर कलेच्या माध्यमातून सुंदर अशी लोकल आणि स्थानक त्याने तयार केली आहे. गेले महिनाभर आधी स्केच बनविणे, बारकावे शोधणे आणि मग या वस्तूंच्या सहाय्याने ही लोकल बनविणे हे काम राहुल आणि त्याचे सहकारी दोन मित्रांनी हा अतिशय सुंदर देखावा तयार केला आहे. दहा दिवस हा गणपती बाप्पा वडिया यांच्या घरात या लोकलच्या डब्ब्यात विराजमान रहाणार आहे.

गणपती बाप्पा हा या लोकलमधूनच लोकांची संकटे दूर करेल

समाज माध्यमातून या कलेचे प्रचंड कौतुक होत आहे. या बाबत राहुल वडिया म्हणाले की, दरवर्षी गणेशोत्सवात मुंबईची लोकल गजबजून जाते. मात्र गेले दोन वर्षे मुंबई ची ही जीवनवाहिनी असलेली लोकल सामान्यांसाठी बंद होती. मात्र, आता पुन्हा दोन कोव्हिड प्रतिबंधक डोस घेतलेल्या नागरिकांना ही लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाचा गणपती बाप्पा हा या लोकलमधूनच लोकांची संकटे दूर करण्यास येत आहे अशी संकल्पना या मागची असल्याचे राहुल वडिया यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.