ETV Bharat / city

शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद देण्याच्या नावाखाली 100 कोटीची मागणी; पाच जणांना अटक

author img

By

Published : Jul 26, 2022, 8:44 PM IST

राज्यातील शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाखाली 100 कोटी रुपये मागणाऱ्या पाच जणांना मरीन लाईन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. तर, आज एक जणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, या सर्वांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

महानगर दंडाधिकारी न्यायालय
महानगर दंडाधिकारी न्यायालय

मुंबई - राज्यातील शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या नावाखाली 100 कोटी रुपये मागणाऱ्या पाच जणांना मरीन लाईन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. तर, आज एक जणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, या सर्वांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आरोपींचे वकिल माहिती देताना

न्यायालयीन कोठडीत रवानगी - मंत्री पदाच्या नावाखाली 100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्यांविरोधात आमदार राहुल कुल यांच्या खाजगी स्वयंसहाय्यकाच्या तक्रारीवरून मरीन लाईन पोलिसांनी 17 जुलै रोजी सापळा रचून चार चौघांना अटक केली. त्यानंतर या चौघांनी 26 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील पाचवा व्यक्ती नंदकिशोर प्रसाद याला सोमवार रोजी अटक करण्यात आल्यानंतर आज या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले - दरम्यान, मंत्रीमंडळात सहभागी होण्यासाठी इच्छूक असलेल्या आमदारांना असे एजेंट किंवा आरोपी फोन करून हेरत आहेत. मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार राहुल कुल यांना भेटण्यासाठी आले होते. मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी 100 कोटी मागितल्याचे आरोपींनी कुल यांना सांगितले. त्यानंतर 17 जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदाराची भेट घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळात सहभागासाठी 90 कोटी रुपये मागत असून त्यातील 20 टक्के रक्कम उद्या द्यावे लागतील असे सांगितले. मात्र, पैसे घेण्यासाठी आमदाराने आरोपींना मुंबईच्या ऑबेरॉय हॉटेलमध्ये बोलावले. मुंबई पोलिसांनी ओबेरॉय हॉटेलमध्ये सापळा रचून चौघांना अटक केली. मात्र, यांच्या वकिलांनी वरील सर्व आरोप हे फेटाळून लावले आहेत.

फसवणूक करण्याचा प्रयत्न - राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या नंदनवन आणि सागर या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चौघांनी आमदारांना गाठून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मंत्रीपद देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पुन्हा एक जणाला अटक - त्यांना सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी एकजणाला अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर तीन जणांचे नावे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एक जणाला अटक करण्यात आली आहे.

मरीन लाईन पोलिसांची कारवाई - आमदारा राहुल कुल यांच्या खाजगी सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार मरीन लाईन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत रियाज अल्लाबक्ष शेख (41), कोल्हापूर, योगेश मधुकर कुलकर्णी (57), पाचपाखाडी, ठाणे, सागर विकास संगवई (37), पोखरण रस्ता, ठाणे व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(53) नागपाडा मुंबई आणि नंदकिशोर प्रसाद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - Eknath Shinde vs Uddhav Thackeray: पालापाचोळ्यांनीचं इतिहास घडवला; एकनाथ शिंदेंचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.