ETV Bharat / city

Kangana Ranaut VS Javed Akhtar Case : अभिनेत्री कंगना रनौतची मुंबई सत्र न्यायालयात धाव - javed akhtar defamation case

ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar Kangana Controversy) यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या फौजदारी कारवाईच्या हस्तांतरणाची मागणी करणारी याचिका अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळल्यानंतर त्या निर्णयाविरोधात अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई सत्र न्यायालयात सोमवारी धाव घेतली आहे.

Kangana Ranaut VS Javed Akhtar Case
Kangana Ranaut VS Javed Akhtar Case
author img

By

Published : Jan 25, 2022, 4:29 PM IST

मुंबई - ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar Kangana Controversy) यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या फौजदारी कारवाईच्या हस्तांतरणाची मागणी करणारी याचिका अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने कोर्टाने फेटाळल्यानंतर त्या निर्णयाविरोधात अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई सत्र न्यायालयात सोमवारी धाव घेतली आहे. या याचिकेवर 27 जानेवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण ?
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

काय म्हटले होते कंगनाने?
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.
हेही वाचा - जावेद अख्तर मानहानी प्रकरणी न्यायालयाकडून कंगनाला दिलासा नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.