ETV Bharat / city

Train Accidents Unidentified Bodies : रेल्वे अपघातांतील ४३४ मृतदेह बेवारस; वारसांचा शोध लावण्याचे पोलिसांचे प्रयत्न - कल्याण रेल्वे स्थानक

प्रवास करीत असताना काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी प्रवासी उपनगरीय रेल्वे रुळ ओलांडतात. मात्र, रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या अकरा महिन्यात १ हजार ५७४ जणांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला आहे. यामध्ये मृत्यु झालेल्यांपैकी ४३४ मृतदेहांची ( Unidentified Death Bodies in railway accidents ) अद्याप ओळख पटलेली नाही. यामुळे हे बेवारस मृतदेह पोलिसांकडे आहेत.

रेल्वे अपघात
railway accidents
author img

By

Published : Dec 26, 2021, 10:18 AM IST

मुंबई : शहरातील लोकांचे जीवल हे घड्याळाचे काट्याप्रमाणे धावत असते. कारण या लोकांना आपली सर्व कामे करण्यासाठी वेळेचे बंधन असते. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी या लोकांची प्रचंड धावपळ होत असते. कामावर वेळेत पोहचण्यासाठी प्रवास करीत असताना काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी प्रवासी उपनगरीय रेल्वे रुळ ओलांडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे. मागील अकरा महिन्यात
१ हजार ५७४ लोकांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला ( Death in railway accidents ) आहे. यामध्ये ४३४ मृतदेह ( Unidentified Death Bodies ) असे आहेत ज्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे हे बेवारस मृतदेह पोलिसांकडे आहेत.

पोलिसांच्या समोर आव्हान -

लोकलच्या धडकेने, खांबास धडक लागल्याने, लोकलमधून तोल सुटल्याने अशा विविध कारणांनी अपघात होतात. यामध्ये सर्वाधिक अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना होतात. रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ ( Mumbai Railway Development Corporation ), मध्य व पश्चिम रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले आहे. मात्र तरीही रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. दररोज उपनगरीय रेल्वे मार्गावर किमान ८ ते १० प्रवासी विविध अपघातात आपला जीव गमावतात. उपनगरीय रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांच्या कालावधीमध्ये एक हजार ५७४ जणांचा रेल्वे अपघातांत मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये १ हजार १४० मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र ४३४ मृतदेहांच्या वारसांचा शोध लागला नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. रेल्वेच्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांचे चेहरे किंवा इतर अवयवांवरून ओळख पटविणे व त्याचा शोध घेणे हे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांच्या समोर आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

कल्याण रेल्वे स्थानकावर सर्वाधिक मृत्युमुखी -

रेल्वेच्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. अपघातानंतर मृतांची ओळख पटविणे अथवा त्यांच्या नातेवाइकांना शोधण्यासाठी विविध उपाययोजना रेल्वे पोलिसांकडून राबविल्या जातात. दरम्यान, रेल्वे तिकीट किंवा त्या मृताजवळ असलेल्या मोबाइलवरून त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणे सोपे होत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात गेल्या अकरा महिन्यात २६२ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू (killed in 11 months at Kalyan railway station )झाले आहेत. त्यापैकी २०१ जणांची ओळख पटली आहे. मात्र, ६१ जणांची ओळख पटलेली नाही.

अशा प्रकारे लावली जाते विल्हेवाट-

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या बेवारस व्यक्तीचा मृतदेह हा नियमानुसार सात दिवस ठेवू शकतो. परंतु त्याच्या वारसांचा शोध लागावा यासाठी हे मृतदेह १५ ते २० दिवस शवागरात ठेवले जातात. वसई, नालासोपारा, भाईंदर अशा ठिकाणच्या भागातील शवागरात हे मृतदेह ठेवले जातात. या दिवसात मृतांच्या वारसांचा शोध लागला नाही तर त्यांची नियमानुसार पोलिसांच्या मार्फत विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यानंतरही वारसांना मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटावी यासाठी त्यांचे डीएनएही काढून ठेवले जातात.

अनाेळखी मृत्यदेहांची आकडेवारी -

रेल्वे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सीएसएमटी १८, दादर १३, कुर्ला ३४, ठाणे ४६, डाेबिवंली २२, कल्याण ६१, कर्जत १३, वडाळा २३, वाशी २९, पनवेल १९, चर्चगेट ४, मुंबई सेंट्रल २१, बांद्रा २३, अंधेरी ४, बाेरीवली ४० वसई ३३ आणि पालघर ३१ अशा एकूण ४३४ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांसमोर हे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा - Mumbai Locals Mega Block Today: रविवारी 'या' रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.